अविनाश नारकरांची पार पडली शस्त्रक्रिया; डॉ. तात्याराव लहाने यांनी केली सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:37 IST2023-06-30T13:33:54+5:302023-06-30T13:37:56+5:30
Avinash narkar: अविनाश नारकर यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.

अविनाश नारकरांची पार पडली शस्त्रक्रिया; डॉ. तात्याराव लहाने यांनी केली सर्जरी
मराठी सिनेविश्वातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणजे अविनाश नारकर (avinash narkar). आजवरच्या कारकिर्दीत अविनाश यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ते '36 गुणी जोडी' या मालिकेत काम करत आहेत. अविनाश नारकर उत्तम अभिनयासह त्यांच्या फिटनेसमुळेही ओळखले जातात. बऱ्याचदा ते सोशल मीडियावर योग करतानाचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात. मात्र, फिटनेस फ्रिक असलेल्या अविनाश यांची अलिकडेच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे.
अविनाश नारकर सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहे. त्यामुळे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट ते चाहत्यांना देत असतात. यात नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसिद्ध नेत्र चिकित्सक तात्याराव लहाने यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
"जय हरि विठ्ठल! आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्षाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली...!! विठ्ठल विठ्ठल. जय हरि विठ्ठल", असं कॅप्शन देत अविनाश नारकर यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत तात्याराव लहाने आणि ऐश्वर्या नारकर दिसून येत आहेत.
दरम्यान, हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अविनाश नारकर यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. यात सध्या ते कन्यादान, श्रीमंता घरची सून आणि ते '36 गुणी जोडी' या मालिकांमध्ये दिसून येत आहेत.