१० वर्षांचं नातं, मराठमोळ्या अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; शेअर केली रोमँटिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:13 IST2025-01-26T17:12:08+5:302025-01-26T17:13:10+5:30
आख़िरकार, मेरे हाथों में तुम्हारे चेहरे का स्पर्श...! अभिनेत्याने बायकोसाठी लिहिल्या रोमँटिक ओळी

१० वर्षांचं नातं, मराठमोळ्या अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; शेअर केली रोमँटिक पोस्ट
'तू तेव्हा तशी', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमध्ये दिसलेला हँडसम मराठी अभिनेता अभिषेक रहाळकर (Abhishek Rahalkar) लग्नबंधनात अडकला आहे. परवाच त्याचा साखरपुडा आणि लगेच लग्नसोहळाही पार पडला. टेलिव्हिजन क्षेत्रातील काही कलाकारांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. अभिषेकने गुपचूप लग्न करत सर्वांना सुखद धक्काच दिला. तर आता त्याने काही तासापूर्वी लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने छानशी कविताही कॅप्शनमध्ये लिहिली आहे.
अभिषेक रहाळकरने नुकतीच कृतिका कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. नवरा नवरी दोघंही कमालीचे सुंदर दिसत आहेत. अभिषेकने वर्क असलेली पांढरी शेरवानी घातली आहे. खांद्यावर लाल रंगाचं उपरणं आहे. डोक्यावर फिक्या रंगाचा फेटा बांधला आहे. गळ्यात मोत्यांची माळ, हातात सोन्याचं कडं आहे. तर कृतिकाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. साजेसे दागदागिने आगेत. नवरी मुलगी अगदीच गोड दिसत आहे.
अभिषेकने त्यांचा फोटो शेअर करत लिहिले, "२०१५-२०२५-इन्फिनिटी...आख़िरकार!! मेरे हाथों में तुम्हारे चेहरे का स्पर्श!! इस ग़ज़ल-नुमा जमालका हर एक हर्फ़ मेरे हिस्से इस इश्क़-ओ-जुनूँ का एहसास ला-फ़ानी है ये वजह-ए-शादमानी है मेरी जाँ आख़िरकार हमनें हिज़्र पे फ़तह पा ली है!! तुम्हारे चेहरे की बनावट, तुम्हारे जिस्म के नक्श, तुम्हारे माथे की खुशबू, महसूस करने के लिए अब सपनों की ज़रूरत नहीं! ये अब मेरा हासिल हैं, हक़ीक़त हैं,मेरे हैं तुम मेरी हो और मैं तुम्हारा ये जहाँ ख़ूबसूरत है,तुम ख़ूबसूरत हो तुम मेरा जहाँ हो,मेरे पास हो,साथ हो कितनी खुशी की बात है कि मैं जब चाहूँ तुम्हारे आँखों में देख सकता हूँ मुबारक हो!!"
अभिषेक आणि कृतिका गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर आता त्यांनी आयुष्यातील पुढच्या टप्प्याला सुरुवात केली आहे. कृतिका मूळची नाशिकची आहे. तिने पुण्यातून मानसशास्त्रात शिक्षण घेतलं आहे. ती काऊन्सिलिंग घेते.
अभिषेक आणि कृतिकाच्या लग्नाला 'दुर्वा'फेम रुमानी खरे, अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख, सायली देवधरसह काही कलाकारांनी हजेरी लावली होती.