पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:05 IST2024-02-07T17:04:44+5:302024-02-07T17:05:55+5:30
Prithvik and shivali dance: पृथ्वीक आणि शिवालीचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स
छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyajatra). या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रसाद खांडेकर (prasad khandekar), नम्रता संभेराव (namrata sambherao) ,ओंकार भोजने (onkar bhojane) , गौरव मोरे (gaurav more) ही सगळी कलाकार मंडळी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतात. परंतु, यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील शिवाली परब (shivali parab) आणि पृथ्वीक प्रताप (prithvik pratap) या जोडीची चर्चा रंगली आहे. आपल्या विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारी ही जोडी पहिल्यांदाच एका रोमॅण्टिक व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.
'कल्याणची चुलबूली' अशी ओळख निर्माण केलेल्या शिवालीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेता पृथ्वीक प्रताप याने स्क्रीन शेअर केली असून पहिल्यांदाच ते एका रोमॅण्टिक गाण्यावर डान्स करताना दिसून आले.
सध्या सोशल मीडियावर पृथ्वीक आणि शिवालीचा व्हिडीओ व्हायरल होत असून या जोडीने टिप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या जोडीला नव्या अंदाजात पाहून चाहते सुद्धा अवाक् झाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
दरम्यान, पृथ्वीक आणि शिवाली यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोनी मराठीवरील 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या कार्यक्रमातील आहे. शिवालीने या मालिकेतील हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.