'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:32 IST2023-10-09T17:31:28+5:302023-10-09T17:32:09+5:30
निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेचे घराघरात चाहते आहेत. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक खूप प्रेम करतात. आता या लोकप्रिय मालिकेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. बनेच्या या फोटोंमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
निखिल बने नुकतंच 'आई कुठे काय करते'च्या सेटवर गेला होता. निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने "अभि अभि बने आया" असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून बने घराघरात पोहोचला. हास्यजत्रेने बनेला एक वेगळी ओळख मिळवून दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉइज ४ चित्रपटातही बने झळकला आहे. निरंजन कुलकर्णीने शेअर केलेल्या या फोटोमुळे चित्रपटानंतर आता बने मालिकेत एन्ट्री घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.