Video: गुरंढोरं,शेतीवाडी अन् प्रशस्त घर! पाहा प्रियदर्शनी इंदलकरची गावची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:00 PM2023-07-03T19:00:00+5:302023-07-03T19:00:02+5:30

Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनीच्या गावी पोहोचले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार

maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar village house video viral | Video: गुरंढोरं,शेतीवाडी अन् प्रशस्त घर! पाहा प्रियदर्शनी इंदलकरची गावची संपत्ती

Video: गुरंढोरं,शेतीवाडी अन् प्रशस्त घर! पाहा प्रियदर्शनी इंदलकरची गावची संपत्ती

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रियदर्शनीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. आपल्या विनोदांमुळे कायम चर्चेत येणारी प्रियदर्शनी सध्या तिच्या गावच्या घरामुळे चर्चेत आली आहे.

सध्या प्रियदर्शनी तिच्या गावी गेली असून यावेळी तिने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमलाही तिच्यासोबत नेलं आहे. अभिनेत्री वनिता खरात हिने तिच्या ‘सुमीतवनी’ या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘प्रियदर्शनी इंदलकरच्या गावच्या शेताची सफर’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियदर्शनीचं घर, शेती सारं काही पाहायला मिळत आहे.

प्रियदर्शनी हिचं गावी मोठं प्रशस्त घर आहे. तसंच त्यांची शेतीवाडी असून तितकेच त्यांच्याकडे गुरंढोरंदेखील आहे. तसंच या ठिकाणी त्यांचं 'मधुबन' या नावाने फार्महाऊसदेखील आहे.  दरम्यान, प्रियदर्शनीच्या गावच्या घरी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, ओंकार राऊत, वनिताचा नवरा सुमीत लोंढे हे गेले होते.

Web Title: maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar village house video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.