We Are Back! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या शूटिंगला सुरूवात; प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:02 IST2024-11-08T09:58:52+5:302024-11-08T10:02:18+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या आगामी नवीन सीझनच्या शुटिंगला सुरुवात, अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर व्हिडीओ केला आहे.

maharashtrachi hasya jatra shooting begin actress prajakta mali share video on set  | We Are Back! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या शूटिंगला सुरूवात; प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील व्हिडीओ 

We Are Back! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या शूटिंगला सुरूवात; प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील व्हिडीओ 

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा शो बंद होता. त्यामुळे हास्यरसिक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. अलिकडेच सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंद झाले. शिवाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहे. मागील काही पर्व प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्राजक्ताने हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. We Are Back! असं म्हणत व्हिडीओमधून तिने नव्या सीझनच्या शुटिंगला सुरूवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेतील कलाकार तसेच शोचे परिक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर दिसत आहेत. येत्या २ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शूट केल्याचा पाहायला मिळतोय. 

आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहे. प्राजक्ताचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश प्रचंड झाले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - कॉमेडीची हॅटट्रिक!” २ डिसेंबरपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.

Web Title: maharashtrachi hasya jatra shooting begin actress prajakta mali share video on set