'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, उरले फक्त ४ दिवस ...; लग्नाची लगबग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:33 IST2025-12-01T11:29:12+5:302025-12-01T11:33:21+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ,होणाऱ्या पत्नीचं मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, उरले फक्त ४ दिवस ...; लग्नाची लगबग सुरू
Nimish Kulkarni Tie Knot Soon : सध्या सर्वत्र लगीन सराईला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकरांची देखील लग्नाची लगबग सुरु आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी तसेच शिवानी नाईक असे अनेक कलाकार येत्या काही दिवसांमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यात आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता निमिष कुलकर्णी देखील येत्या काही दिवसांत बोहल्यावर चढणार आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच निमिषने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

सध्या निमिषच्या घरात लग्नाची लगबग सुरू झाली असून त्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत निमिषचा घाणा भरण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर निमिषचे काही फोटो समोर आले केले आहेत. या फोटोंमध्ये निमिषच्या डोईवर मुंडवळ्या आणि तो मनोभावे पूजाविधी करताना दिसत आहे. येत्या चार दिवसांत निमिष लग्नबंधनात अडकणार असल्याचंही या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे.
होणाऱ्या पत्नीचं मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन...
निमिष कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोसह बरीचं कामे केली आहेत. स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतही तो झळकला होता. निमिश कुलकर्णीच्या होणाऱ्या पत्नीचं नाव कोमल भास्कर आहे. कोमल सुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे.मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते.