"Finally ती आली...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं खरेदी केली ड्रीम बाईक, किंमत ऐकलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:29 IST2025-09-15T11:26:44+5:302025-09-15T11:29:01+5:30

"Finally माझ्या आयुष्यात ती आली…", हास्यजत्रेतील अभिनेता नक्की कुणाबद्दल बोलला?

maharashtrachi hasya jatra fame actor nikhil bane buy new dream bike share post know about the price | "Finally ती आली...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं खरेदी केली ड्रीम बाईक, किंमत ऐकलीत का?

"Finally ती आली...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं खरेदी केली ड्रीम बाईक, किंमत ऐकलीत का?

Nikhil Bane: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमाने बऱ्याच नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे. या कॉमेडी शोमधून निखिल बने हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. भांडुपचा शशी कपूर' असं नाव त्याला या शोमुळे मिळालं.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये निखिलची एक वेगळीच क्रेझ आहे. निखिल सध्या चर्चेत आला आहे. आता ही चर्चा निखिलाच्या कॉमेडीची नव्हेतर त्याने खरेदी केलेल्या नव्या बाईकची आहे. नुकतीच सोशल मिडिया खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याची ड्रीम बाईक खरेदी केल्याची आनंदवार्ता चाहत्यांना दिली आहे.


सध्याच्या काळात स्पोर्टस बाईकची प्रचंड क्रेझ आहे. अशा स्पोर्टस बाईकवरून प्रवास करणं सोयीचं असतं. निखिल बनेने अशीच पिवळ्या रंगाची स्क्रॅम्बलर ४०० एक्ससी   ही बाईक खरेदी केली आहे.आता त्याच्या या बाईकची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा रंगत आहे. सध्या मार्केटमध्ये या बाईकची किंमत जवळपास २.९४ लाख रुपये इतकी आहे.हा ब्रॅंड बाईक प्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

"Finally माझ्या आयुष्यात ती आली… माझी “Dream Bike...", असं कॅप्शन देत निखिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट लिहून शेअर केली आहे. दरम्यान,नवीन बाईक पाहताच निखिलचं कौतुक करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Web Title: maharashtrachi hasya jatra fame actor nikhil bane buy new dream bike share post know about the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.