थायलंडमध्ये बॉक्सिंग मॅच पाहताना कुशलने शिवांगीला केलं kiss, रिलेशनशिप कन्फर्म?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:16 IST2024-06-06T13:15:48+5:302024-06-06T13:16:19+5:30
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु

थायलंडमध्ये बॉक्सिंग मॅच पाहताना कुशलने शिवांगीला केलं kiss, रिलेशनशिप कन्फर्म?
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने (Shivangi Joshi) काही दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. शिवांगी सध्या अभिनेता कुशल टंडनला (Kushal Tandon) डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. दोघं लग्न करणार अशा बातम्या आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन यात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र आता त्यांचा kiss करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कुशट टंडन आणि शिवांगीच्या फॅन पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यामध्ये दोघंही बॉक्सिंग मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत. गप्पा मारत असतानाच कुशल मध्येच शिवांगीच्या गालावर kiss करतो. हा व्हिडिओ त्यांच्या थायलंड व्हॅकेशनवेळचा असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप व्हिडिओची पुष्टी झालेली नाही. मात्र चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा पुन्हा रंगली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
याआधी दोघांचा बॉक्सिंग मॅच पाहतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. शिवांगीने पोल्का डॉट शॉर्ट्स आणि व्हाईट टॉप घातला होता. तर कुशल ऑलिव्ह ग्रीन टीशर्टमध्ये कूल दिसत होता.
कुशल टंडन गेल्या काही महिन्यांपासून थायलंडमध्येच आहे. तिथे तो मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. कुशलला भेटण्यासाठीच शिवांगीही तिथे गेली असंच आता दिसून येतंय. कुशल टंडन हा गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड आहे. बिग बॉसमध्ये असताना दोघांमध्ये अफेअर सुरु झालं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. तर शिवांगीही बराच काळ 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील कोस्टार मोहसिन खानला डेट करत होती. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं.