कुशल बद्रिकेने पहिल्यांदाच शेअर केला लग्नातला फोटो; म्हणतो- "वाट्याला आलेलं अतिसाधारण रुप अन्.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:27 IST2025-02-26T17:27:11+5:302025-02-26T17:27:28+5:30

कुशल बद्रिकेने पहिल्यांदाच शेअर केला लग्नातला फोटो; बायकोसाठी लिहिली अशी पोस्ट सगळीकडे कौतुकाचा वर्षाव (kushal badrike)

kushal badrike first time share his wedding photo on social media sunaina badrike | कुशल बद्रिकेने पहिल्यांदाच शेअर केला लग्नातला फोटो; म्हणतो- "वाट्याला आलेलं अतिसाधारण रुप अन्.."

कुशल बद्रिकेने पहिल्यांदाच शेअर केला लग्नातला फोटो; म्हणतो- "वाट्याला आलेलं अतिसाधारण रुप अन्.."

कुशल बद्रिके(kushal badrike) हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कुशलने 'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. कुशलने अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. तर काही भूमिकांच्या माध्यमातून कुशलने प्रेक्षकांना भावुकही केलंय. कुशल सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतो. अशातच कुशलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केलाय. 

कुशल लग्नाचा फोटो पोस्ट करुन म्हणतो...

कुशलने पत्नी सुनैना बद्रिकेसोबतचा लग्नातला फोटो शेअर केलाय. कुशलने या फोटोत पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. कुशल लिहितो की, "साऱ्या जगात फक्त आपल्या वाट्याला आलेलं अतिसाधारण रूप, आर्थिक अडचण, रक्तातून उसळी घेत असलेली inferiority, मनातली भीती, काळजातली धडधड, जीवातला काहूर, सगळं… सगळं… बाजूला टाकून चेहऱ्यावर “हसू” जपणारी माणसं भेटली ना, की कुणीतरी आपल्या समोर एखादा खूपऽऽऽ जुना “आरसा” आणून ठेवल्या सारखं वाटत."


कुशलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. "एखाद्या छायाचित्राला शाब्दिक अलंकारांनी खुलवणं तुम्हाला चांगलं जमतं", "बापरे ओळखता येत नाहीये कुशल तुम्हाला, खूप छान दिसत आहात तुम्ही दोघे", "तुम्ही जे काही लिहिता ते स्वतः कुठे तरी अनुभवलेल असतं म्हणून ते जास्त भावतं", "ताई सारखा जोडीदार तुम्हाला मिळाला हे नशिब आहे", अशा शब्दात कमेंट करुन चाहत्यांनी कुशल आणि सुनैना या पती-पत्नीचं कौतुक केलंय. कुशलने सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे.

Web Title: kushal badrike first time share his wedding photo on social media sunaina badrike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.