Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 14:17 IST2019-01-15T14:12:59+5:302019-01-15T14:17:04+5:30
‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय. या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत.

Koffee With Karan 6: आई की बायको कुणाला जास्त घाबरतो अभिषेक बच्चन?
ठळक मुद्देया रॅपिड फायरमध्ये करणने श्वेतालाही एक प्रश्न केला. अभिषेकची कोणती गोष्ट तू सहन करतेस, असा प्रश्न करणने केला. यावर त्याचा सेन्स आॅफ ह्युमर, असे श्वेता म्हणाली. मग काय, तिचे हे उत्तर ऐकून करण आणि अभिषेक दोघांनाही हसू आवरता आले नाही.
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोचे सहावे सीझन सध्या कधी नव्हे इतके चर्चेत आहे. या शोचा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय. या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रीव्ह्यू टीजर रिलीज झाला आणि अभिषेकची ‘पोल’ खुलली. होय, अभिषेक आई जया बच्चनला अधिक घाबरतो की बायको ऐश्वर्या राय बच्चनला, हे लोकांना कळले.
होय, तू सर्वांत जास्त कोणाला घाबरतोस, पत्नीला की आईला? असा प्रश्न ‘रॅपिड फायर’ राऊंडदरम्यान करणने अभिषेकला विचारला. त्यावर अभिषेकने आई असे उत्तर दिले. पण श्वेताने मात्र अभिषेकची पोल खोललीच. तो आईला नाही तर बायकोला अधिक घाबरतो, असे श्वेताने सांगून टाकलं. यावर अभिषेक बिचारा काय बोलणार....तू शांत राहा, हा माझा रॅपिड फायर आहे, एवढेच तो म्हणाला.
या रॅपिड फायरमध्ये करणने श्वेतालाही एक प्रश्न केला. अभिषेकची कोणती गोष्ट तू सहन करतेस, असा प्रश्न करणने केला. यावर त्याचा सेन्स आॅफ ह्युमर, असे श्वेता म्हणाली. मग काय, तिचे हे उत्तर ऐकून करण आणि अभिषेक दोघांनाही हसू आवरता आले नाही.
टीजर पाहता, ‘कॉफी विथ करण 6’चा हा नवा एपिसोड इंटरेस्टिंग दिसतोय. अभिषेक व श्वेता ही बहीण भावाची जोडी आणखी काय धम्माल करते, याची उत्सुकता सगळ्यांचा असणार आहे.