कार्तिकी-दिपिकाने रचला नवा प्लॅन; आता तरी एकत्र येतील का कार्तिक-दीपा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:23 IST2022-05-12T18:22:28+5:302022-05-12T18:23:04+5:30
Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकी व दिपिका त्यांच्या आई-वडिलांची भेट व्हावी यासाठी त्यांना देवळात घेऊन जाण्याचा आग्रह करतात.

कार्तिकी-दिपिकाने रचला नवा प्लॅन; आता तरी एकत्र येतील का कार्तिक-दीपा?
छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla). आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेची रंगत वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहिलेले कार्तिक आणि दीपा यांच्यातील अंतर आता हळूहळू मिटतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यात त्यांच्या लेकीदेखील त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत.
कार्तिक आणि दीपा लग्न केलं तर आपलं एकत्र कुटुंब तयार होईल या विचाराने कार्तिकी आणि दीपिका त्यांची योजना आखू लागल्या आहेत. त्यामुळे कार्तिक व दीपा यांची वारंवार कशा प्रकारे भेट होईल यासाठी त्या प्रयत्न करत असतात. असाच एक प्लॅन या दोघींनी यावेळी केल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकी व दिपिका त्यांच्या आई-वडिलांची भेट व्हावी यासाठी त्यांना देवळात घेऊन जाण्याचा आग्रह करतात. त्यामुळे दोघंही मुलींना घेऊन जातात. विशेष म्हणजे देवळात गेल्यावर या दोघी मुद्दाम कार्तिक व दिपिकाला एकत्र वेळ घालवण्यासाठी एक सोडतात.
दरम्यान, कार्तिकी आणि दिपिका यांचा प्लॅन कार्तिक-दीपाच्या लक्षात येत आहे. या दोघी मुद्दाम या गोष्टी घडवून आणत असल्याचं त्यांना कळत आहे. मात्र, लेकींच्या हट्टापुढे ते काहीही करु शकत नाही. त्यामुळेच आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी या दोन चिमुकल्यांनी केलेला प्लॅन यशस्वी ठरेल का? कार्तिक-दीपा खरंच एकत्र येतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.