​ ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ फेम मोहित मलिकने व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:47 IST2018-05-07T07:17:34+5:302018-05-07T12:47:34+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत ...

'Kalfikumar Baajwala' Fame Mohit Malik has expressed the desire | ​ ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ फेम मोहित मलिकने व्यक्त केली ही इच्छा

​ ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ फेम मोहित मलिकने व्यक्त केली ही इच्छा

्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेताल सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी आकृती शर्मा तर प्रेक्षकांची चांगलीच लाडकी बनली आहे. ही आकृती केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर या मालिकेतील कलाकारांची देखील लाडकी झाली आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मोहित मलिकला तर ही चिमुरडी खूपच आवडते. 
मोहित मलिक आणि आकृती शर्मा यांना एकत्र चित्रीकरण करण्यास सुरुवात करून जेमतेम एक महिना होत आहे. पण इतक्यातच मोहितवर आकृतीच्या लाघवी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडू लागला आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत रॉकस्टार सिकंदरची भूमिका रंगविणारा मोहित मलिक मालिकेतील आपली मुलगी कुल्फी (आकृती शर्मा) हिच्याबरोबर बराचसा वेळ व्यतीत करत असतो. आपल्याला कन्यारत्न झाले, तर ती मुलगी आकृतीसारखी असावी, असे मोहितने नुकतेच म्हटले आहे. मालिकेमध्ये बऱ्याच वेळा चुकामूक झाल्यावर आता हे दोघे समोरासमोर आले आहेत. त्यामुळे आता हे दोघे मालिकेसाठी अनेकवेळा एकत्र चित्रीकरण करतात. याविषयी मोहित सांगतो, “मी आकृतीला फारसा ओळखत नाही, पण ती माझ्यात जी ऊर्जा निर्माण करते, त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. माझे तिच्याशी एक वेगळेच नाते आहे, ती जणू माझीच मुलगी आहे, अशी भावना माझ्या मनात निर्माण होते. मला तिच्याबरोबर चित्रीकरण करायला खूप आवडते.”
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत लव्हली आणि सिकंदर या व्यक्तिरेखा अनुक्रमे अंजली आनंद आणि मोहित मलिक साकारत आहेत. मालिकेत या दोन कलाकारांमध्ये पती-पत्नीचे नाते असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे मालिकेत दाखविण्यात आले आहे तर कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसत असल्याचे सुरुवातीला दाखवण्यात आले होते.  

Also Read : कुल्फीकुमार बाजेवाला फेम अंजली आनंदच्या या नव्या इनिंगविषयी तुम्ही ऐकले का?

Web Title: 'Kalfikumar Baajwala' Fame Mohit Malik has expressed the desire