वय वर्ष ४७ पण अभिनेत्रीला मूल नकोय, लग्नही करायचं नाहीये; सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:39 IST2025-09-18T16:35:56+5:302025-09-18T16:39:42+5:30

ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीच्या निर्णयामागचं कारण ऐकून सर्वांना धक्का बसला आहे

jaya bhattacharya dont want child and dont want getting married actress revealed | वय वर्ष ४७ पण अभिनेत्रीला मूल नकोय, लग्नही करायचं नाहीये; सांगितलं मोठं कारण

वय वर्ष ४७ पण अभिनेत्रीला मूल नकोय, लग्नही करायचं नाहीये; सांगितलं मोठं कारण

 एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करण्याचा आणि मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ही अभिनेत्री आहे जया भट्टाचार्य. प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी अनेक वर्षांपासून लग्न का केले नाही, याबद्दलचं कारण सांगितलं आहे. तब्बल ११ वर्षे बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहूनही तिने लग्न करण्याचा निर्णय का घेतला नाही, याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

म्हणून लग्न आणि मूल नकोय

एका मुलाखतीत जया यांनी सांगितलं की, ''सुरुवातीला माझा पार्टनरसोबत लग्न करण्याचा विचार होता, परंतु काही गोष्टी अशा घडल्या की मला त्या समजल्या नाहीत. आमच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर माझा विचार पक्का झाला की मला लग्न करायचं नाही. पण माझ्या पार्टनरला लग्न करायचं होतं. त्याला मूल सुद्धा हवं होतं. पण मला मूल नको होते. मी विचार केला की, मी जर कामावर गेले तर माझ्या मुलाला कोण शिकवणार, माझी मोलकरीण? मला माझ्या आई-वडिलांचीही काळजी घ्यायची होती. पण माझ्या पार्टनरला मुलांची इच्छा होती. याच कारणामुळे आम्ही लग्न केलं नाही.''




कोण होता जया यांचा पार्टनर?

जया या दिग्दर्शक माजाहिर रहिमसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. रहिम हे जयापेक्षा १९ वर्षांनी मोठे होते. हे दोघे ११ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर त्यांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जया यांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. परंतु रहिम यांचे विचार वेगळे होते. त्यामुळे दोघं वेगळे झाले. सध्या जया भट्टाचार्य या टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

Web Title: jaya bhattacharya dont want child and dont want getting married actress revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.