नुकतंच जान्हवीने एका मुलाखतीत आपला महिन्याचा खर्च आणि स्किन केअर रूटिनबद्दल सांगितलं आहे.
जान्हवी किल्लेकरचं स्किन केअर रूटिन ते महिन्याचा खर्च किती? अभिनेत्रीनं केला खुलासा
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar ) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जान्हवीला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. जान्हवीने 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व चांगलंच गाजवलं. 'बिग बॉस'च्या घरात वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर जान्हवीने महाराष्ट्राची नाराजी ओढावून घेतली. पण, त्यानंतर आपला खेळ सुधारत तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेष म्हणजे 'बिग बॉस'मुळे जान्हवीच्या चाहता वर्गातही भर पडली. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. नुकतंच जान्हवीने एका मुलाखतीत आपला महिन्याचा खर्च आणि स्किन केअर रूटिनबद्दल सांगितलं आहे.
जान्हवी ही नुकतंच 'सुमन म्युझिक मराठी' या युट्यूब चॅनेलवरील 'आम्ही असं ऐकलंय' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी जान्हवीला तिचं स्कीन केअर रूटिनविषयी (Janhvi Killekar Share Her Skin Care Routine) विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मी त्वचेसाठी काहीच करत नाही. फेशिअल, ब्लीच असं काहीच करत नाही. मी सनस्क्रीन पण लावत नाही. फेसवॉश वापरते. मी मॉइश्चरायजरसुद्धा फार कमी लावते. तर शूटिंग झाल्यानंतर घरी येऊन मी मेकअप काढते. बेबी ऑइलने टिश्यूचा वापर करून मी चेहरा पुसते. याशिवाय बाकी मी काहीच करत नाही".
पुढे जान्हवीला तिचा महिन्याचा खर्च किती असतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "अजून एक गोष्ट मी सकाळी करते, जी मी चेहऱ्याला लावत नाही. पण, ग्लूटाथिओन (glutathione)चे मी दररोज सेवन करते. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी मी त्याच सेवन करते. पण, मी चेहऱ्याला काही लावत नाही. ग्लूटाथिओनचाच जवळजवळ ३०-३५ हजार महिन्याचा खर्च आहे", असे तिनं सांगितलं.
दरम्यान, जान्हवी किल्लेकर सध्या स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसतेय. इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. या भूमिकेतून अभिनेत्री पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या रील्सना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसतं.
Web Title: Janhvi Killekar Share Her Skin Care Routine And Monthly Expenses