अशी झाली ‘गुलाम’मालिकेच्या सेटवर पती पत्नीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 17:10 IST2017-03-30T11:40:49+5:302017-03-30T17:10:49+5:30

रोजच्या रोज चित्रीकरणाचा बिझी शेड्युअलमुळे कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देणेही शक्य होत नाही.पण तुमचा जोडीदार समजुतदार असेल, तर ...

It was like 'Ghulam' on a set of husbands wife's visit | अशी झाली ‘गुलाम’मालिकेच्या सेटवर पती पत्नीची भेट

अशी झाली ‘गुलाम’मालिकेच्या सेटवर पती पत्नीची भेट

जच्या रोज चित्रीकरणाचा बिझी शेड्युअलमुळे कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देणेही शक्य होत नाही.पण तुमचा जोडीदार समजुतदार असेल, तर कुटुंबासाठी खास  वेळ काढायची गरज पडत नाही. कारण कुटुंबच तुमच्या भेटीला येते. ‘गुलाम’ मालिकेत वीरची भूमिका साकारणा-या विकास मानकताला याची पत्नी (‘कुछ अपने, कुछ पराए’फेम) गुंजन मानकताला हिने त्याची मालिकेच्या सेटवर अनपेक्षितपणे भेट घेतली. ती आपल्याबरोबर स्वत: बनवलेले जेवण घेऊन आली होती. विकासने यासंदर्भात सांगितले, “माझ्या सुंदर पत्नीला सेटवर आलेली पाहून मला मनापासून आनंद झाला. माझ्या मालिकेच्या सततच्या चित्रीकरणामुळे मी तिच्यासोबत पुरेसा वेळ काढू शकत नाही. पण ती माझ्यासाठी अशा लहानसहान गोष्टी सतत करीत असते.मला गुंजनसारखी जीवनसाथी मिळाली,याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. तिने घरी बनविलेलं जेवण आणि केक माझ्यासाठी आणला होता.तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र केक कापून सेलिब्रेशन केले.” विकासची काही गुपिते सांगताना गुंजन म्हणाली, “विकास हा अतिशय जबाबदार आणि काळजी घेणारा पती आहे.घरी तो एखाद्या लहान मुलासारखाच वागतो. रात्री झोपण्यापूर्वी त्याला हेड मसाज लागतो. पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तो सर्वात उत्तम नवरा आहे.”

Web Title: It was like 'Ghulam' on a set of husbands wife's visit