'...ते पाहून काळीज तुटले', सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अली गोनी झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 13:40 IST2021-09-03T13:39:31+5:302021-09-03T13:40:04+5:30

बिग बॉस १३चा विजेता आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे.

'... I was saddened to see that', Ali Goni became emotional after seeing Shehnaz after the death of Siddharth Shukla | '...ते पाहून काळीज तुटले', सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अली गोनी झाला भावुक

'...ते पाहून काळीज तुटले', सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अली गोनी झाला भावुक

बिग बॉस १३चा विजेता आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर छोट्या पडद्यावरील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रेटींनीदेखील सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान अभिनेता अली गोनीने केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. 

सिद्धार्थच्या निधनानंतर अली गोनी त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथे शेहनाज गिल देखील उपस्थित होती. शेहनाजला पाहून अलीने ट्वीट केले आहे. त्याने म्हटले की, ‘नेहमी हसरा असणारा चेहरा… आनंदी असणारा चेहरा.. आज जसा पाहिला ते पाहून काळीज तुटले’. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे.

कूपर रुग्णालयात गुरुवारी संध्याकाळी सिद्धार्थ शुक्लाचे पोस्टमॉर्टम पार पडले. जवळपास ४ तास हे पोस्टमॉर्टम सुरु होते. ५ डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केले आहे आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्डही करण्यात आला आहे. आज पोलिसांकडून सिद्धार्थ शुल्काचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सादर केला जाणार आहे. सिद्धार्थच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

बिग बॉस फेम आसिम रियाज, अली गोनी आणि प्रिन्स नरुला सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्य संस्कारासाठी पोहोचले आहेत. 
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.

Web Title: '... I was saddened to see that', Ali Goni became emotional after seeing Shehnaz after the death of Siddharth Shukla