"शरीर पिवळं पडलं अन् मग...", झिरो फिगरचा ट्रेंड फॉलो करणं अभिनेत्रीला पडलं महागात; शेअर केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:57 IST2025-07-28T17:43:06+5:302025-07-28T17:57:13+5:30
झिरो फिगरसाठी वर्षभर पालक सूप पित होती अभिनेत्री, वजन घटवलं मग नंतर...

"शरीर पिवळं पडलं अन् मग...", झिरो फिगरचा ट्रेंड फॉलो करणं अभिनेत्रीला पडलं महागात; शेअर केला अनुभव
Tv Actress Talk About Diet: आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊ लागला आहे. प्रत्येकाला सुंदर आणि स्लिम ट्रीम दिसणं हवंहवसं असतं. बिझी शेड्युलमुळे अनेकांना वर्कआउट करायला जमतच असंही नाही. परंतु, एखाद्या वजन कमी करणं,ट्रान्सफॉर्मेशनसाठी अनेक कलाकार जीममध्ये राहणं याचे अनेकदा कलाकार शेअर करत असतात. अशातच हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्रीने तिच्या फिटनेस जर्नीचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला. झिरो फिगरच्या अट्टाहासामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर डाएटचा गंभीर परिणाम झाल्याचं तिने म्हटलं आहे.
नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये रुबिना दिलैकने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगितलं. त्यावेळी बॉडी शेमिंगमुळे वजन कमी नादात तिच्या हातून एक चूक घडल्याचं तिने म्हटलं. रुबीनाने पॉडकास्टमध्ये हजेरी लावली, तेव्हा ती म्हणाली, माझ्या करिअरमधील पहिल्याच टीव्ही शोदरम्यान मला लूकमुळे अनेकांची बोलणी ऐकावी लागली. त्यामुळे मी खूपच डिप्रेशनमध्ये गेले होते. झिरोफिगरसाठी मी फक्त पालक सूप प्यायचे.
त्यानंतर रुबिना म्हणाली, "झिरो फिगर मेन्टेन करण्याच्या नादात मी वजन कमी केलं. पण, त्यानंतर मी खूपच कमजोर झाले. शरीर पिवळं पडलं होतं. शिवाय अंगात काही ताकदच राहिली नव्हती. आता जर मी मागे वळून पाहिलं तर मला असं वाटतं की मी ते सगळं का करत होते?" त्याचबरोबर अभिनेत्रीने असंही म्हणाली की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचं डाएट फारच साधं असायचं. मुळची हिमाचलची असल्यामुळे दुध, तूप यांसारखे पदार्थ ती भरपूर खायची. मात्र, इंडस्ट्रीत आल्यानंतर खाण्यापासून सगळ्याच गोष्टी बदलल्या, असं तिने सांगितलं.
रुबिनाचं वर्कफ्रंट
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकन दोन वर्षापूर्वी तिच्या जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. दोन्ही मुलींची विशेष काळजी घेत आहे. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांनी आपल्या मुलींना मुंबईत नाही तर हिमाचल प्रदेशमध्येच ठेवलं आहे. सध्या रुबिना कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नसून ती कुटुंबाकडे लक्ष देतेय.