हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:33 IST2025-01-31T10:31:46+5:302025-01-31T10:33:50+5:30

अभिनेत्याने हिनाला तिच्या कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासात सकारात्मक राहण्यासाठी प्रेरित केलं आहे.

hina khan bumped into sunil grover at airport actress says my favourite padosi | हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..."

हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..."

टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे हे सर्वांनाच माहित आहे. या कठीण प्रसंगातही ती शक्य तितकं सकारात्मक राहत आहे. तसंच ती सतत सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. किमोथेरपीतून जात असताना होत असलेला त्रासही ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त करते. इतकंच नाही तर हिना जमेल तितकं कामही करत आहे. अवॉर्ड फंक्शन असो किंवा बिग बॉसचा सेट किंवा अगदी रॅम्प वॉक हिनाने सगळीकडे हजेरी लावली आहे. दरम्यान नुकतंच तिला विमानतळावर एक अभिनेता भेटला जो तिचा शेजारी आहे. कोण आहे तो?

विमानतळावर हिना खानसमोर अचानक अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover) आला. योगायोगाने हे शेजारी विमानतळावरच भेटले. हिनाने सुनीलसोबत फोटो शेअर करत लिहिले, "आज सकाळीच विमानताळवर माझ्या आवडत्या शेजाऱ्याला भेटले. मला कॅन्सर झाल्याचं समजल्यावर तू मला ज्याप्रकारे सकारात्मक राहण्यासाठी प्रेरित केलंस ते दिवस मी कधीही विसरणार नाही. माझ्या किमोथेरपीवेळी तू मला वेगवेगळ्या रेसिपीजची पुस्तकं पाठवायचा जेणेकरुन तोंडाची बिघडलेली चव परत आणण्यासाठी मी त्या डिशेस बनवायचा प्रयत्न करेन. ती खूप चांगला परफॉर्मर आहेस हे सगळ्यांनाच माहित आहे. यासोबतच तू खूप चांगला माणूस आणि मित्रही आहेस. मला प्रेरित करत राहिल्याबद्दल तुझे खूप आभार."


हिनाच्या या पोस्टवर सुनील ग्रोवरने कमेंट करत लिहिले, "हिना, माझी मैत्रीण. तू खूप धाडसी मुलगी आहेस. तुझी आनंदी वृत्ती अनेकांना प्रेरित करते. देव करो तुला चांगलं आरोग्य आणि आनंद मिळो. ते म्हणतात ना शेजाऱ्यांवर प्रेम असावं आणि माझं आहेच."

हिना खानने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसाठीही पोस्ट लिहिली होती. या प्रवासात तो तिच्यामागे सावलीसारखा उभा आहे तिची सेवा करत आहे याची झलक तिने दाखवली होती. 

Web Title: hina khan bumped into sunil grover at airport actress says my favourite padosi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.