​ससुराल सिमर का या मालिकेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 12:32 IST2017-09-07T07:02:26+5:302017-09-07T12:32:26+5:30

ससुराल सिमर का ही मालिका गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार ...

Good news for Sussaur's Fan series | ​ससुराल सिमर का या मालिकेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

​ससुराल सिमर का या मालिकेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

ुराल सिमर का ही मालिका गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. पण ससुराल सिमर का या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ससुराल सिमर का ही मालिका संपणार नसून या मालिकेला काही महिन्यांचे एक्सटेन्शन मिळाले असल्याचे म्हटले जात आहे.
ससुराल सिमर का या मालिकेची जागा इश्क मे मर जावा ही मालिका घेणार होती. या मालिकेत अर्जुन बिजलानी आणि आलिश पानवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण आता ससुराल सिमर का या मालिकेच्या जागेवर इश्क मे मर जावा ही मालिका सुरू होत असली तरी ससुराल सिमर का या मालिकेची वेळ बदलून देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. १९ सप्टेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार होता. पण आता काही महिने तरी ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मालिकेत रोहन मेहराची नुकतीच एंट्री झाली आहे. त्यानेच ही बातमी मीडियाला दिली आहे. तो सांगतो, मालिका अजून काही महिने तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मालिका संपणार असे ठरले असल्याने आता पुढे काय दाखवायचे यावर क्रिएटिव्ह टीम विचार करत आहे. त्यामुळे सध्या आम्ही चित्रीकरण करत नाही आहोत. खरे तर ही बातमी म्हणजे आमच्यासाठी एक सरप्राईजच आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण पुढच्या आठवड्यात आमचे चित्रीकरण संपणार हे कळल्यावर आम्ही फिरायला जाण्याचे बेत बनवले होते. पण आता ते रद्द करावे लागणार आहेत. 

Also Read : ​रोहन मेहरा सेटवर ‘हा’ सीन करताना झाला गंभीर जखमी; वाचा सविस्तर!

Web Title: Good news for Sussaur's Fan series