घन:श्याम दरवडेच्या निधनाची पसरली अफवा, 'छोटा पुढारी' वैतागून व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:24 IST2025-06-25T17:23:33+5:302025-06-25T17:24:19+5:30

कोणत्या तरी एका दादाने त्याच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केली की...

ghanshyam darode shares video stating he is alive as his death rumours were spreaded on social media | घन:श्याम दरवडेच्या निधनाची पसरली अफवा, 'छोटा पुढारी' वैतागून व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

घन:श्याम दरवडेच्या निधनाची पसरली अफवा, 'छोटा पुढारी' वैतागून व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 5) पाचव्या सीझनमधून प्रसिद्धीझोतात आलेला 'छोटा पुढारी' म्हणजेच घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या निधनाची अफवा पसरली होती. अनेकांचे त्याला काळजीने फोन आले. आता त्याने व्हिडीओ शेअर करत सविस्तर सांगितलं आहे. ती अफवा होती, मला काहीही झालेलं नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. 

घन:श्याम दरोडे व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "नमस्कार मित्रांनो, सर्वांचे खूप धन्यवाद. व्हिडीओ बनवण्याचं कारण एकच आहे की आजपर्यंत अनेकांनी मला ट्रोल केलं. वाईटसाईट बोललं. निगेटिव्ह कमेंट्स केल्या. पण आज कळलं की माणूस गेल्यानंतर त्याच्यामागे सगळे किती चांगलं बोलतात. भलेही तो माणूस जीवंत असो नसो. मला एकच सांगायचंय तुमची कायम साथ आहे म्हणूनच घन:श्याम दरोडे खंबीरपणे लढला आणि लढत राहील."


"कोणत्या तरी एका दादाने त्याच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केली की बिग बॉस फेम घन:श्याम दरवडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तुम्हाला एकच सांगतो तुमच्या घन:श्यामला काहीही झालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहिली तर दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य उलट वाढतं. पण मला त्या दादाला एकच सांगायचंय जे माझ्या बाबतीत केलं ते इतरांच्या बाबतीत करु नको. तुम्हाला सर्वांना विनंती काळजी करु नका, मला फोन करु नका. प्रेमाने करताय पण काळजीने फोन करु नका. मी धडधाकट आहे. मला काहीही झालेलं नाही. मी व्यवस्थित चालतोय, बोलतोय. दोन महिन्यापूर्वी माझा अपघात झाला होता. आता मी व्यवस्थित आहे. ती अफवा आहे. ती पोस्ट खरी नाही. धन्यवाद."

Web Title: ghanshyam darode shares video stating he is alive as his death rumours were spreaded on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.