"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:28 IST2026-03-16T12:25:39+5:302026-03-16T12:28:03+5:30

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप व्हायरल होतोय. यात सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले यांच्यासमोर गौरव मोरेने खास टिप्पणी केली त्याची चर्चा आहे.

Gaurav More comment on sai tamhankar samir choughule gulkand movie sachin goswami | "सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया

"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया

नुकताच 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात २०२५  मधील गाजलेल्या कलाकृतींना गौरवण्यात आले. डॉ. निलेश साबळे आणि अमेय वाघ यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी विनोदी सादरीकरण करुन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. अशातच 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप व्हायरल होतोय. यात सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले यांच्यासमोर गौरव मोरेने खास टिप्पणी केली त्याची चर्चा आहे.

सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर...

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात गौरव मोरे, भाऊ कदम, निलेश साबळे एका स्कीटमध्ये एकत्र आहेत. खाली प्रेक्षकांमध्ये सचिन गोस्वामी, समीर चौघुले एकत्र बसलेले दिसत आहेत. ''मी हृता दुर्गुळेचा हिरो आहे'', असं गौरव मोरे म्हणतो. बाकीचे त्याच्या निवडीवर आक्षेप घेतात आणि हसतात. पुढे गौरव मोरे म्हणतो, ''काय प्रॉब्लेम आहे. सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर मी हृताचा हिरो का नाही? 



पुढे गौरव मोरे समीर यांच्याकडे बघतो. समीरही त्याला हात दाखवतात. पुढे भाऊ कदम गौरवजवळ येऊन त्याला विचारतात, ''हे लिखित आहे की पर्सनल बोलतोय?'' गौरव मोरे बोलतो, ''पर्सनल आहे... नाही नाही! हे लिखित आहे दादा'', अशाप्रकारे 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील हा मजेशीर क्षण चांगलाच व्हायरल झाला. यानिमित्ताने हास्यजत्रा सोडल्यावर अनेक दिवसांनी गौरव मोरे, सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले एकत्र पाहायला मिळाले. या तिघांना एकत्र बघून चाहत्यांनाही चांगलाच आनंद झाला. 'हास्यजत्रा' सोडल्यावर गौरव मोरे 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसला होता.

Web Title : साई के हीरो पर गौरव मोरे की टिप्पणी; गोस्वामी की प्रतिक्रिया।

Web Summary : ज़ी चित्र गौरव 2026 में, गौरव मोरे ने खुद को हृता दुर्गुले का हीरो बताते हुए साई के हीरो समीर चौघुले से तुलना की। हास्यपूर्ण पल वायरल हुआ, जिससे हास्ययात्रा की तिकड़ी फिर से मिली।

Web Title : Gaurav More's comment on Sai's hero: Goswami's reaction.

Web Summary : At Zee Chitra Gaurav 2026, Gaurav More joked about being Hruta Durgule's hero, comparing himself to Sai's hero, Sameer Choughule. The humorous moment went viral, reuniting the Hasyajatra trio.