निधीला झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 10:31 IST2016-07-08T05:01:47+5:302016-07-08T10:31:47+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील कलाकारांच्या मागे साडेसाती लागली आहे असेच म्हणावे लागेल. या मालिकेत अक्षराच्या सासूची ...

The fund has accidents | निधीला झाला अपघात

निधीला झाला अपघात

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील कलाकारांच्या मागे साडेसाती लागली आहे असेच म्हणावे लागेल. या मालिकेत अक्षराच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या क्षीती जोगची गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती आणि आता या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या निधी उत्तमच्या गाडीला नुकताच अपघात झाला. मंगळवारी रात्री चित्रीकरणावरून परतताना निधीच्या गाडीला अपघात झाला. समोरच्या बाजूने येणाऱ्या गाडीने तिच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. या अपघातात सुदैवाने निधीला मोठी दुखापत झाली नाही. ती संपूर्णपणे व्यवस्थित असून तिने दुसऱ्या दिवशीपासून चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. 

Web Title: The fund has accidents