ऐन दिवाळीत 'या' गंभीर आजाराने त्रस्त होती जुई गडकरी; पोस्ट पाहून चाहते पडले चिंतेत, म्हणाली- "पहिला दिवस...",
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:12 IST2025-11-01T09:57:13+5:302025-11-01T10:12:38+5:30
'ठरलं तर मग'मधील सायलीला ऐन दिवाळीत झाला 'हा' गंभीर आजार, पोस्ट शेअर करत म्हणाली...

ऐन दिवाळीत 'या' गंभीर आजाराने त्रस्त होती जुई गडकरी; पोस्ट पाहून चाहते पडले चिंतेत, म्हणाली- "पहिला दिवस...",
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत सायलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनाराव राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.जुई गडकरीचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून म्हणून तिला ओळखलं जातं. जुई गेली अनेक वर्ष मालिकाविश्वात सक्रिय आहे. तसेच याचबरोबर ती जाहिरातींमध्ये काम करताना दिसते. मात्र, उत्तम करिअर सुरु असताना अनेकदा तिला गंभीर आजाराचा सामना करावा लागला आहे. त्यात अभिनेत्रीची यंदाची दिवाळीही आजारपणात गेली.
नुकतीच जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे तिने या दिवाळीत तिला टायफॉईड झालेला असं तिने म्हटलं आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत यंदाची दिवाळी तिच्यासाठी कशी होती हे सांगितलंय. ही पोस्ट पाहून अभिनेत्रीचे चाहते चिंतेत आहेत. शिवाय ती लवरकरात लवकर बरी व्हावी, असं म्हणत आहेत.
अभिनेत्रीला झालेला टायफॉईड...
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये जुईने 'या वर्षीची दिवाळी टायफॉइड रिटर्नवाली...survived' असं लिहिलं आहे. त्याचबरोबर दिवाळीत ती कुठे-कुठे गेली शिवाय काही खास क्षणांची माहितीही तिने दिली आहे. त्यातबरोबर या पोस्टच्या माध्यमातून तिने, दाराबाहेरचे कंदील, घरातला कंदील, आईसोबतचा फोटो, आई आणि बाबांसोबतचा फोटो, फराळ, आजोबांसोबतचा फोटो, काकांसोबतचा फोटो, काही देवांचे फोटो असे खास क्षण अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
जुई गडकरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'पुढचं पाऊल', 'वर्तुळ' तसंच 'सरस्वती'यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने काम केलं आहे.'पुढचं पाऊल' ही मालिका तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. सध्या ती 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.