विघ्नहर्ता गणेश मालिकेच्या टीमला केवळ ३० सेकंदाचा प्रोमो बनवायला लागला इतका कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:12 IST2018-05-01T05:42:41+5:302018-05-01T11:12:41+5:30

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा 'विघ्नहर्ता गणेश' हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना देखील प्रेक्षकांचे खूप ...

The duration of the 30-second-long promo that the team of Vindhahta Ganesh series started was to create a promo | विघ्नहर्ता गणेश मालिकेच्या टीमला केवळ ३० सेकंदाचा प्रोमो बनवायला लागला इतका कालावधी

विघ्नहर्ता गणेश मालिकेच्या टीमला केवळ ३० सेकंदाचा प्रोमो बनवायला लागला इतका कालावधी

नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा 'विघ्नहर्ता गणेश' हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना देखील प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळत आहे. भगवान गणेशाच्या, विघ्नहर्त्याच्या न ऐकलेल्या कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशभरात ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता निर्माते महाकालीच्या दहा अवतारांच्या कथा सांगून दर्शकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. प्रत्येक अवताराच्या उत्पत्तीची एक अतिशय मनोरंजक असून देवीचे हे विविध रूप प्रेक्षकांना प्रचंड भावतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
 'विघ्नहर्ता गणेश' या मालिकेच्या प्रॉडक्शन टीमने १४ वेगवेगळ्या देवी म्हणजेच महाकाली, तारा, शोदाशी, भुवनेश्वरी, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला आणि छिन्नामस्ता यांचे स्वरूप डिझाइन करण्यासाठी धार्मिक शास्त्रांचे व्यापक संशोधन केले आहे. प्रत्येक देवतेचे एक वेगळे स्वरूप आणि वेगळी उपकरणं आणि शस्त्रे आहेत. जी त्याच्या भिन्न रूपाशी संबधित आहेत. प्रॉडक्शन हाऊसने सुमारे १५ मेकअपमनची यासाठी खास व्यवस्था केली असून केवळ ३० सेकंदाचा प्रोमो तयार करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. 
 'विघ्नहर्ता गणेश' या मालिकेत आकांक्षा पुरी पार्वतीची भूमिका साकारत आहे. एकाच मालिकेत इतक्या भूमिका साकारायला मिळत असल्याने ती चांगलीच खूश आहे. ती सांगते, "मी विघ्नहर्ता गणेशच्या आईची म्हणजेच पार्वतीची भूमिका पार पाडण्याच्या संपूर्ण अनुभवाचा आनंद घेत आहे. मी पडद्यावर दाखवलेल्या पात्रतेमुळे मला दुर्गाच्या विविध अवतारांना साकारण्याची संधी मिळाली आहे. महाकालीच्या दहा अवताराच्या आगामी भागांविषयी मी खरोखर उत्साहित आहे. १५ व्यावसायिकांची एक टीम तीन दिवसासाठी सतत काम करत होती. त्यातील 24 तास सर्व अद्वितीय स्वरूप परिपूर्ण आहे की नाहीत हे सुनिश्चित करण्यात गेले. हा एक सुंदर अनुभव होता कारण माझे स्वरूप सतत बदलत होते आणि त्यातील काहींना बॉडी पेंट वापरण्याची आवश्यकता होती. एकंदरीत मी त्याचा खूप आनंद घेतला, तसाच आनंद प्रेक्षक देखील महाकालीच्या कथा पाहताना घेतील याची मला खात्री आहे." 

Also Read : टेलिव्हिजनवर काम करणे एन्जॉय करतेयः आकांक्षा पुरी

 

Web Title: The duration of the 30-second-long promo that the team of Vindhahta Ganesh series started was to create a promo