‘डान्स चॅम्पियन्स’ची परीक्षक बनणार दीक्षित ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:55 AM2017-11-07T07:55:34+5:302017-11-07T13:25:34+5:30

‘डान्स चॅम्पियन्स’ हा सगळ्या डान्स रिअॅलिटी शोमधील टॉप फेव्हरेट शो आहे. देशभरातील विविध कानाकोप-यातून स्पर्धक या शोमध्ये सहभागी होत ...

Dixit will become a 'dance champion' tester? | ‘डान्स चॅम्पियन्स’ची परीक्षक बनणार दीक्षित ?

‘डान्स चॅम्पियन्स’ची परीक्षक बनणार दीक्षित ?

googlenewsNext

/>‘डान्स चॅम्पियन्स’ हा सगळ्या डान्स रिअॅलिटी शोमधील टॉप फेव्हरेट शो आहे. देशभरातील विविध कानाकोप-यातून स्पर्धक या शोमध्ये सहभागी होत आपले एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करत असतात.हा शो टेलिकास्ट झाल्यापासून रसिकांचा आवडता कार्यक्रम बनला आहे. ‘डान्स चॅम्पियन्स’ ही इतर  वाहिन्यांवरील डान्स रिअॅलिटी शोमधले विजेते आणि उपविजेते यांच्यातील स्पर्धा आहे. यांच्यातील अटीतटीच्या स्पर्धेत जो विजयी होईल, त्यावरून देशातील सर्वोत्कृष्ट डान्सर  ठरणार आहे. मुळात इतर स्पर्धकांना हरवून आलेल्या डान्सरमधील ही स्पर्धा असल्याने ती काहीशी अवघड आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या डान्स रिअॅलिटी  कार्यक्रमात टेरेन्स आणि रेमो डिसुझा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकार अतिथी परीक्षक म्हणून सहभागी झाले असून आता अशा सेलिब्रिटी परीक्षकांमध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचाही लवकरच समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या अप्रतिम डान्स मुव्हज आणि चेहर्‍्यावरील बोलक्या हावभावाने रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही माधुरी लवकरच या कार्यक्रमाच्या परीक्षकाची जबाबदारी पार पाडताना झळखणार आहे.‘डान्स चॅम्पियन्स’ कार्यक्रमातील अंतिम 10 स्पर्धक हा विजयचषक पटकाविण्यासाठी अहोरात्र खूप मेहनत घेत आहेत. त्यांना दर आठवड्याला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. माधुरी केवळ एक जज म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार नसून तीसुध्दा या स्पर्धकांपुढे एक नवे आव्हान ठेवणार आहे.‘डान्स चॅम्पियन्स’च्या आगामी भागांत ही एकेकाळची सुपरस्टार नायिका आपली मोहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर टाकणार असली, तरी तिचे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्यावरच या स्पर्धकांचे भवितव्य ठरणार आहे. आता स्पर्धकही माधुरी जज करणार म्हटल्यावर तिच मन जिंकण्यासाठी आपल्या अनोख्या डान्सिंग स्टाइलने परफॉर्म करत माधुरीचे मन जिंकतात का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गोविंदा आणि करिश्मा यांनी  कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या एका भागात खास परीक्षक म्हणून गोविंदा आणि करिश्मा कपूर हजेरी लावणार म्हटल्यावर त्यांच्याच सुपरहुट गाण्यावर त्यांनी  स्पर्धकांसह ठेका धरला. राजा बाबूमधील 'आजा आजा' या गाण्यावर देखील परफॉर्मन्स देत सा-यांची वाहवा मिळवली.  

Web Title: Dixit will become a 'dance champion' tester?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.