'जय श्री कृष्ण'मधील कान्हाची भूमिका साकारली चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, आता अशी दिसते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:45 PM2023-11-30T14:45:49+5:302023-11-30T14:49:40+5:30

'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणारा तो छोटा कृष्ण आठवतोय का? या बाळकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.

Dhriti bhatia played bal krishna character jai shri krishna see then and now look | 'जय श्री कृष्ण'मधील कान्हाची भूमिका साकारली चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, आता अशी दिसते

'जय श्री कृष्ण'मधील कान्हाची भूमिका साकारली चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, आता अशी दिसते

2008 साली छोट्या पडद्यावरची एक पौराणिक मालिका चांगलीच गाजली. या मालिकेचे नाव ‘जय श्री कृष्ण’ (Jai Shri Krishna). लॉकडाऊन काळात जुन्या मालिका पुन्हा सुरू झाल्या होत्या. यात या मालिकेचाही समावेश होता. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर या मालिकेची हटकून आठवण येते आणि या मालिकेतील छोटा कृष्णही तेवढाच हटकून आठवतो. या बाळकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. मालिकेतील ही बाळकृष्णाची भूमिका साकारणारा मुलगा नसून मुलगी होती. तिचे नाव धृती  भाटिया (Dhriti Bhatia). ‘जय श्री कृष्ण’ मालिकेत बालकृष्णाची भूमिका साकारणारी ही धृती आता चांगलीच मोठी झाली आहे. 

मालिकेत भूमिका साकारली तेव्हा ती केवळ तीन वर्षांची होती. आता तिला पाहाल तर हीच ती हे पाहून जरा आश्चर्याचा धक्का बसेल.मालिकेत काम करत असताना  धृतीफा रच लोकप्रिय झाली होती. अगदी ती जिथे जायची तिथे तिच्याभोवती लोकांचा गराडा पडायचा. लोक अगदी भक्तीभावाने तिला भेटायला यायचे. अगदी बालकृष्ण म्हणून तिचे लाड करायचे.

आता ही मालिका संपून बरीच वर्षे झालीत. पण तिचा तो गोड चेहरा लोक विसरलेले नाहीत. या मालिकेनंतर  धृतीने ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतही काम केले होते. शिवाय ‘माता की चौकी’ या मालिकेतही ती झळकली होती.

 ती जय श्री कृष्णानंतर डोंट वरी चाचू आणि इस प्यार को क्या नाम दूं  (Iss Pyaar Ko Kya Naam Doon) सारख्या शोमध्ये दिसली आहे. धृतीचे वडील बिझनेसमॅन असून आई कोरिओग्राफर आहे. आईप्रमाणेच  धृतीलाही नृत्याची आवड आहे आणि भविष्यात कोरिओग्राफर व्हायची तिची इच्छा आहे. सध्या धृती शास्त्रीय नृत्य शिकतेय. ‘जय श्री कृष्ण’ ही मालिका रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांनी बनवली होती.

Web Title: Dhriti bhatia played bal krishna character jai shri krishna see then and now look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.