Devoleena Bhattacharjee : ऐसी क्या मजबूरी थी देवोलिना?, पतीसोबतच्या फोटोमुळे 'गोपी बहू' ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 13:07 IST2023-01-15T13:06:31+5:302023-01-15T13:07:22+5:30
Devoleena Bhattacharjee : फर्स्ट वन मंथ ॲनिव्हर्सरीनिमित्त देवोलिनाने पतीसोबतचे काही रोमॅन्टीक फोटो शेअर केलेत. यानंतर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात. काहींनी मात्र यावरून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

Devoleena Bhattacharjee : ऐसी क्या मजबूरी थी देवोलिना?, पतीसोबतच्या फोटोमुळे 'गोपी बहू' ट्रोल
गोपी बहू ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. देवोलिनाने नुकतंच जीम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाला नुकताच महिना पूर्ण झाला. फर्स्ट वन मंथ ॲनिव्हर्सरीनिमित्त देवोलिनाने पतीसोबतचे काही रोमॅन्टीक फोटो शेअर केलेत. यानंतर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात. काहींनी मात्र यावरून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
देवोलिनाने पती शाहनवाजसोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती शाहनवाजच्या हातात हात घालून पोझ देतेय. समोर केक ठेवलेला दिसतोय. आमच्यासाठी आनंदाचा आणि अविश्वसनीय असा एक महिना..., असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. हे फोटो पाहून काही जणांनी देवोलिनाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
'आखिर ऐसी क्या मजबूरी थी देवोलीना?', असं एका युजरने लिहिलं. यापेक्षा तर राखी सावंतचा आदिल चांगला दिसतो, असं शब्दात एका युजरने त्यांना ट्रोल केलं. जोकर दिसतो तुझा नवरा, अशी कमेंट एका ट्रोलरने केली आहे. काहींनी मात्र देवोलिनाची पाठराखण करत, तिला पाठींबा दिला आहे. माणसाची किंमत त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या गुणांवरून होते, असं एका युजरने म्हटलं आहे.
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून देवोलिना घराघरात पोहोचली. तिने मालिकेत गोपी बहू ही भूमिका साकारली होती. आता देवोलीना लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरूवातीला तिने पतीचा चेहरा दाखवला नव्हता. पण नंतर तिने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. ‘मी अभिमानाने सांगू शकते की मी माझं लग्न झालंय आणि होय शोनू.. दिवा घेऊन शोधले असते तरी तुझ्यासारखा भेटला नसता. माझी दु:खं आणि प्रार्थनांचं उत्तर तू आहेस. तुझ्यावर मी खूप प्रेम करते’, असं तिने म्हटलं होतं.