पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:00 IST2024-05-08T12:59:54+5:302024-05-08T13:00:35+5:30
Madhuri dixit: माधुरीला वाढदिवसापूर्वी एक खास सरप्राइज गिफ्ट मिळाव यासाठी डान्स दिवानेच्या सेटवर श्रीराम नेने यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. आजवर असंख्य सुपरहिट सिनेमा माधुरीने इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे तिच्यासोबत स्क्रीन शेअर करावी अशी अनेकांची इच्छा असते. माधुरी सध्या छोट्या पडद्यावरील 'डान्स दिवाने सीजन 4' या कार्यक्रमात परिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. अलिकडेच माधुरीचा वाढदिवस या मंचावर साजरा करण्यात आला. यावेळी तिच्या पतीने म्हणजेच डॉ. श्रीराम नेने यांनी तिला गोड सरप्राइज दिलं.
माधुरीला वाढदिवसापूर्वी एक खास सरप्राइज गिफ्ट मिळाव यासाठी 'डान्स दिवाने'च्या सेटवर श्रीराम नेने यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी माधुरी आणि श्रीराम नेने यांनी एका रोमॅण्टिक गाण्यावर डान्स केला हा व्हिडीओ चॅनेलने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
माधुरी आणि श्रीराम नेने यांनी साथ 'तुमसे मिलकर ऐसा लगा' या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे त्यांचा डान्स पाहून भारती सिंह, सुनील शेट्टी सुद्ध थक्क झाले. सध्या या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.