दलजीतनंतर दुसऱ्या पतीच्याही सोशल मीडियावरुन फोटो गायब, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:04 IST2024-02-16T13:02:55+5:302024-02-16T13:04:37+5:30

दलजीत कौरचा दुसरा संसारही मोडणार?

Dalljiet Kaur the second husband Nikhil Patel also deleted the wedding photos divorce talks | दलजीतनंतर दुसऱ्या पतीच्याही सोशल मीडियावरुन फोटो गायब, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

दलजीतनंतर दुसऱ्या पतीच्याही सोशल मीडियावरुन फोटो गायब, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दुसऱ्या पतीपासूनही ती वेगळी होत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चा तेव्हा सुरु झाल्या जेव्हा दलजीतने इन्स्टाग्रामवरुन पतीसोबतचे सर्व फोटो काढले. इतकंच नाही तर ती तिच्या मुलासोबत भारतातही परत आली. माध्यम रिपोर्टनुसार आता दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचंही समजत आहे. यामुळे या चर्चा आणखी जोरात पसरु लागल्या आहेत.

दलजीत कौर 'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. अनेक मालिकांमध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचं काम केलं. दलजीतचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेता शालीन भनोतशी झालं होतं. त्यांना एक मुलगाही झाला. यानंतर दलजीतने शालीनवर आणि त्याच्या कुटुंबावर हिंसाचाराचे आरोप लावले. त्यांचा घटस्फोट झाला. अनेक वर्षांनी दलजीतच्या आयुष्यात निखील पटेलची एन्ट्री झाली. निखिलही घटस्फोटित होता आणि त्याला दोन मुली आहेत. दलजीत आणि निखिल प्रेमात पडले. गेल्या वर्षीच त्यांनी लग्न केलं. दलजीत पती आणि मुलांसोबत नैरोबीला शिफ्ट झाली. तिने लग्नानंतरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले होते. तसंच दुसऱ्या लग्नानंतर ती खूप खूश असल्याचंही तिने सांगितलं होतं. मात्र आता अचानक तिने फोटो हटवल्याने चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. शिवाय तिने इन्स्टाग्राम बायोमधून नावापुढील पटेल सुद्धा काढलं आहे. शिवाय दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं असून निखिल पटेलनेही दलजीतसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. 

काही दिवसांपूर्वी दलजीतने या चर्चांवर मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, 'मी आणि माझा मुलगा जेडन माझ्या आईवडिलांच्या सर्जरीसाठी भारतात आलो आहोत. बाकी गोष्टींवर सध्या मी काहीही बोलू इच्छित नाही. माझ्या मुलांची प्रायव्हसी मला जपायची आहे."

Web Title: Dalljiet Kaur the second husband Nikhil Patel also deleted the wedding photos divorce talks