Confirmed! शनाया उर्फ रसिका सुनील करतेय या व्यक्तीला डेट

By तेजल गावडे | Published: January 5, 2021 01:30 PM2021-01-05T13:30:17+5:302021-01-05T13:31:01+5:30

रसिका सुनील या व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र आता याबाबतचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे.

Confirmed! Shanaya alias Rasika Sunil is dating this person | Confirmed! शनाया उर्फ रसिका सुनील करतेय या व्यक्तीला डेट

Confirmed! शनाया उर्फ रसिका सुनील करतेय या व्यक्तीला डेट

googlenewsNext

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली. त्या पोस्टची सर्वत्र चर्चा होताना दिसली. या पोस्टमधील फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा तरूण कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले होते. अखेर तिने याबाबतचा उलगडा केला आहे.

रसिका सुनीलने न्यू इअरच्या शुभेच्छा देत फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिले होते. तिने लिहिले की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन... या वर्षाची मी ऋणी असण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तू...


रसिकाच्या या पोस्टनंतर ती या व्यक्तीला डेट करते अशी चर्चा सगळीकडे रंगताना दिसली. मात्र त्याबद्दल नुकताच तिने खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे कबूल केले आहे. तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.


आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.


रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती बसस्टॉप, गर्लफ्रेंड व गॅटमॅट चित्रपटात झळकली आहे.

Web Title: Confirmed! Shanaya alias Rasika Sunil is dating this person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.