कलर्स आणि राजश्री प्रॉडक्शन प्रथमच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 17:16 IST2016-11-26T17:16:41+5:302016-11-26T17:16:41+5:30

असाधारण संकल्पनांच्या मालिका सादर करून आणि मानवी भावनांच्या विविध पातळयांचा शोध घेतल्या नंतर, आता कलर्सने एका सशक्त आणि दृढ ...

Colors and Rajshri Productions combine for the first time | कलर्स आणि राजश्री प्रॉडक्शन प्रथमच एकत्र

कलर्स आणि राजश्री प्रॉडक्शन प्रथमच एकत्र

ाधारण संकल्पनांच्या मालिका सादर करून आणि मानवी भावनांच्या विविध पातळयांचा शोध घेतल्या नंतर, आता कलर्सने एका सशक्त आणि दृढ आईची कथा सादर करण्याची तयारी केली आहे जिचे स्वप्न आहे, तिच्या शैक्षणिकदृष्ट्या हुशार दोन मुलींना कौटुंबिक वातावरणात स्थिरस्थावर होण्याचे. राजस्थानमधील बुंदी नावाच्या एका छोट्या गावाची पार्श्वभूमी असलेली ही कथा आहे आणि तिचे निमार्ते आहेत ख्यातनाम राजश्री प्रॉडक्शन्स प्रा. लि. आणि शोचे नाव आहे एक शृंगार...स्वाभिमान. या शोमध्ये दोन बहिणींची कथा सांगीतली जाणार आहे. ज्या लग्न आणि करिअरची महत्वाकांक्षा यांच्यातील अनेक द्विधा मनस्थितीत सापडलेल्या आहेत. त्या एका रुढीप्रिय मारवाडी कुटुंबातील आहेत आणि अतिशय हुशार आहेत आणि त्यांच्या यशाचा त्यांच्या कुटुंबाला अतिशय अभिमान आहे. संगीता चौहान आणि अंकिता शर्मा दोघीही मनोरंजनाच्या दुनियेत नवीन आहेत आणि त्यांची आई शादराच्या नेतृत्वाखाली बहुआयामी भूमिकांचा शोध घेताना दिसणार आहेत. शारदाची भूमिका करणार आहे बहुप्रसाव कलाकार प्राची शाह पंड्या, जी तिच्या मुलींचे पालनपोषण करताना दिसणार आहे. तसेच परंपरांपासून मुक्त होण्यासाठी सगळयात चांगले शिक्षण त्यांना देऊन सक्षम पाहायला मिळणार आहे. त्यांच्या आईच्या त्यागा बद्दल कृतज्ञ असणाºया मेघना आणि नयना दोघींचीही तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे.  या शोमध्ये काम करण्या विषयी बोलताना प्राची सांगते, राजश्री प्रॉडक्शन सोबत करणे म्हणजे मला घरी आल्यासारखे आहे.कारण मी त्यांच्या फिल्म मध्ये याआधी काम केलेले आहे. माझे पात्र शारदा, हे माज्याशी पूर्णपणे संबंधित आहे कारण आमचे आदर्श साधारण मिळतेजुळते आहेत. ती एक स्वतंत्र आणि स्व-आवश्यक स्त्री आहे, प्रेमळ आई असून, शिक्षण आणि मूल्यांच्या बाबतीत तिच्या मुलींना सर्वात चांगले ते देण्यासाठी धडपडणारी आई आहे. कलर्स आणि राजश्री सोबतच्या या ऐतिहासिक सहभागामध्ये काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे आणि हा माज्या आयुष्यातील एका नवीन प्रकरणाचा प्रारंभ आहे.एक शृंगार...स्वाभिमान मध्ये समृद्ध बावा, साहिल उत्पल, कंवरजित पेंटल, विनय जैन आणि सुचित्रा पिल्ले या सारखे अभिनेते सुद्धा शोच्या प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.


Web Title: Colors and Rajshri Productions combine for the first time