मुंंबईच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्याने घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:47 IST2026-03-20T13:38:12+5:302026-03-20T13:47:25+5:30

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याचं हे स्वप्न नुकतेच पूर्ण झालं आहे.

Bollywood actor arjun bijlani buys house in nature karjat away from mumbai crowd | मुंंबईच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्याने घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून अभिनंदन

मुंंबईच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्याने घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून अभिनंदन

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) नुकतेच हे स्वप्न पूर्ण केले आहे. अर्जुनने महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कर्जतमध्ये एक आलिशान आणि भव्य घर खरेदी केला आहे. नुकताच त्याने आपल्या कुटुंबासह या नवीन घरात गृहप्रवेश केला, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डोंगराच्या कुशीत कोट्यवधींचा बंगला

अर्जुनने खरेदी केलेलं हे नवं घर डोंगररांगांच्या कुशीत असून ते अतिशय भव्य आहे. या घराच्या गृहप्रवेशाच्या पूजेचे काही खास क्षण अर्जुनने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अर्जुन पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजम्यामध्ये दिसत आहे, तर त्याची पत्नी नेहा स्वामी लाल रंगाच्या पारंपारिक ड्रेसमध्ये पूजेला बसलेली दिसत आहे. त्यांचा मुलगा अयान देखील या पूजेत सहभागी झाला होता.


अर्जुनच्या या घराची एक विशेष गोष्ट म्हणजे घराचे इंटिरिअर. त्याने संपूर्ण घरासाठी 'व्हाईट थीम' (White Theme) निवडली आहे. घरातील फर्निचर, पडदे, पेंट आणि सजावटीच्या वस्तू सर्व पांढऱ्या रंगाच्या आहेत, ज्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि सुंदर दिसत आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कर्जतचे निसर्गसौंदर्य आणि हिरवळ पाहायला मिळते. अर्जुनने या स्वप्नपूर्तीबद्दल गणपती बाप्पाचे आभार मानले आहेत. त्याचे हे नवीन घर पाहून मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

कर्जतमध्ये केवळ अर्जुनच नाही, तर शिल्पा शिंदे सारख्या इतर अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले 'हॉलिडे होम' बनवले आहे. सध्या अर्जुनच्या या नव्या घराच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title : मुंबई से दूर प्रकृति के बीच अभिनेता ने खरीदा घर, प्रशंसकों ने दी बधाई

Web Summary : अभिनेता अर्जुन बिजलानी ने मुंबई से दूर कर्जत में प्रकृति के बीच एक आलीशान घर खरीदा है। उन्होंने गृहप्रवेश की तस्वीरें सोशल मीडिया पर साझा कीं। घर में सफेद रंग की थीम है और यह बहुत सुंदर है। उनके प्रशंसकों और कई कलाकारों ने उन्हें बधाई दी है।

Web Title : Actor Buys House Near Mumbai in Nature, Fans Congratulate Him

Web Summary : Actor Arjun Bijlani fulfilled his dream by purchasing a lavish house in Karjat, surrounded by nature. He shared photos of the housewarming ceremony on social media. The house features a white theme interior and offers scenic views. Celebrities and fans have congratulated him on his new home.