Bigg boss marathi 4: प्रतीक्षा संपणार अन् घरात पुन्हा राडे रंगणार; 'या' दिवशी नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:20 IST2022-04-29T15:20:00+5:302022-04-29T15:20:02+5:30
Bigg boss marathi 4 : प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा बिग बॉस मराठी या शोचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg boss marathi 4: प्रतीक्षा संपणार अन् घरात पुन्हा राडे रंगणार; 'या' दिवशी नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला?
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून कायम 'बिग बॉस मराठी'कडे (Bigg boss marathi) पाहिलं जातं. आतापर्यंत या शोचं तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे या प्रत्येक सीझनने प्रेक्षकांचं कमालीचं मनोरंजन केलं. घरात रंगणारे राडे, नवनवीन टास्क, सदस्यांमधील मैत्री आणि वाद या सगळ्याच कारणांसाठी तीनही सीझन लोकप्रिय ठरले. यात तिसऱ्या सीझनच्या स्पर्धकांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या सीझनमधील स्पर्धक आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कसर सोडत नाहीत. त्यामुळेच या स्पर्धकांसारखे नवे स्पर्धक वा नवा सीझन कधी भेटीला येणार ही एकच उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर ही प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.
प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा बिग बॉस मराठी या शोचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या पर्वाची चर्चा रंगली आहे. एका इन्स्टाग्राम पेजवर या नव्या पर्वाविषयीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्नांची चर्चा होऊ लागली आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, बिग बॉस मराठीचं चौथं पर्व येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच १० जूननंतर या चौथ्या पर्वाचे प्रोमो समोर येणार आहेत. त्यामुळे जुलैमध्ये हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.
दरम्यान, या नव्या पर्वाची चर्चा सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या नव्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार?, सूत्रसंचालन पून्हा मांजरेकर करणार का? यावेळची बिग बॉसची थीम काय असेल? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.