"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा
By कोमल खांबे | Updated: November 6, 2025 14:04 IST2025-11-06T14:04:27+5:302025-11-06T14:04:56+5:30
Suraj Chavan Sanjana Ukhana Video: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सूरज आणि त्याची होणारी बायको यांचं मोठ्या थाटामाटात केळवण केलं. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने एकमेकांसाठी उखाणाही घेतल्याचं दिसत आहे.

"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा
'बिग बॉस मराठी ५' मधून प्रेक्षकांची मनं जिंकलेला आणि या शोचा विजेता ठरलेला रीलस्टार सूरज चव्हाण लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सूरज चव्हाणची लगीनघाई सुरू असून नुकतंच त्याच्या केळवणाचा कार्यक्रमही पार पडला. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सूरज आणि त्याची होणारी बायको यांचं मोठ्या थाटामाटात केळवण केलं. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने एकमेकांसाठी उखाणाही घेतल्याचं दिसत आहे.
पहिल्यांदा सूरज त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी उखाणा घेतो. उखाण्यातून सूरज त्याच्या बायकोचं नावही सांगतो. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना असं आहे. "बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न, संजनाचं नाव घेतो...बोललो होतो ना आधी करियर मग लग्न", असा उखाणा सूरज संजनासाठी घेतो. त्यानंतर सूरजची होणारी बायको त्याच्यासाठी अगदी हटके पद्धतीने उखाणा घेते. "बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको", असा हटके उखाणा संजना घेते.
सूरजने काही दिवसांपूर्वी लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. मात्र यात त्याने बायकोचा चेहरा दाखवला नव्हता. अंकिताने शेअर केलेल्या केळवणाच्या व्हिडीओत सूरजच्या बायकोचा चेहराही दिसत आहे. आता सूरज आणि संजनाच्या लग्नाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. सूरजला चाहत्यांनी शुभेच्छा देत त्याचं अभिनंदनही केलं आहे.