'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला हळद लागली! तृप्ती देसाईंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
By कोमल खांबे | Updated: December 24, 2025 10:26 IST2025-12-24T10:25:12+5:302025-12-24T10:26:37+5:30
जयच्या हळदी सोहळ्याला 'बिग बॉस मराठी'मधील कलाकारांनीही हजेरी लावली होती. तृप्ती देसाईदेखील जयच्या हळदीला उपस्थित होत्या. त्यांनी जयला हळद लावत त्याच्या हळदी समारंभात डान्सही केला.

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला हळद लागली! तृप्ती देसाईंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. जय दुधाणेने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली होती. नुकताच त्याचा साखरपुडा झाला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता जयला हळद लागली आहे. जयची लगीन घटिका समीप आली असून त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे.
जयच्या हळदी सोहळ्याला 'बिग बॉस मराठी'मधील कलाकारांनीही हजेरी लावली होती. तृप्ती देसाईदेखील जयच्या हळदीला उपस्थित होत्या. त्यांनी जयला हळद लावत त्याच्या हळदी समारंभात डान्सही केला. याचा व्हिडीओ तृप्ती देसाईंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. व्हिडीओत तृप्ती देसाई जय दुधाणे आणि त्याची होणारी पत्नी हर्षला हिला हळद लावताना दिसत आहेत. त्यानंतर हळदीत त्या जयसोबत डान्सही करतात. जयच्या हळदीला लाडक्या दादूसचा ऑर्केस्ट्राही ठेवण्यात आला होता. आता जय आणि हर्षला लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणूनही ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. तर जय दुधाणे 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही दिसला होता.