'बिग बॉस मराठी ६'शी अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:23 IST2025-12-14T17:23:28+5:302025-12-14T17:23:55+5:30
'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. कोकण हार्टेड गर्लने यामागची स्टोरी सांगितली आहे.

'बिग बॉस मराठी ६'शी अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी' संपल्यानंतर 'बिग बॉस मराठी ६'बाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर 'बिग बॉस मराठी ६'ची तारीख आणि वेळ समोर आली आहे. ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू होणार आहे. 'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. कोकण हार्टेड गर्लने यामागची स्टोरी सांगितली आहे.
'बिग बॉस मराठी ६'चा प्रोमो अंकिताच्या नवऱ्याच्या म्हणजेच कुणाल भगतच्या मड आय स्टुडिओमध्ये एडिट केला गेला आहे. या प्रोमोचं म्युझिक कुणालने दिलं आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्टुडिओमध्ये प्रोमो एडिट करतानाची झलक दाखवली आहे. 'बिग बॉस मराठी ५'च्या प्रोमोचं म्युझिकही कुणालनेच केलं होतं अशी माहिती अंकिताने दिली आहे. "हे काम बघताना आमचा सीझन आठवला", असं अंकिता व्हिडीओत म्हणत आहे.
'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालनही रितेश देशमुख करणार आहे. प्रोमो येताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, सोशल मीडियावर मात्र याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ११ जानेवारीपासून संध्याकाळी ८ वाजता 'बिग बॉस मराठी ६' सुरू होणार आहे.