'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणाऱ्या तन्वी कोलतेसाठी 'बॅड न्यूज'; अभिनेत्रीला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:49 IST2026-02-26T15:47:49+5:302026-02-26T15:49:41+5:30
भाऊचा धक्कावर तन्वीचं चांगलंच कौतुक होताना दिसतं. अशातच तन्वीसाठी एक वाईट बातमी आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या

'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणाऱ्या तन्वी कोलतेसाठी 'बॅड न्यूज'; अभिनेत्रीला मोठा धक्का
'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी आहेत. या आठवड्यात कॅप्टन झालेली तन्वी कोलते सध्या चांगलीच चर्चेत आहे. भाऊचा धक्कावर तन्वीचं चांगलंच कौतुक होताना दिसतं. अशातच तन्वीसाठी एक वाईट बातमी आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या
तन्वी कोलतेसाठी बॅड न्यूज
'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या तन्वी कोलतेचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झालं आहे. तन्वीचं इन्स्टाग्राम अकाऊंट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच अॅक्टीव्ह होतं. परंतु तन्वीचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक बंद झाल्याने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. 'बिग बॉस मराठी ६' मुळे तन्वीचे फॉलोअर्स चांगलेच वाढले होते. परंतु अचानक अकाऊंट बंद झाल्याने तन्वीला सोशल मीडियावर मोठा फटका बसणार आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये खेळत असताना स्पर्धकांच्या सोशल मीडियावर त्यांचे चाहते लाईक्स-कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात असतात.
त्यामुळे तन्वीला वैयक्तिकरित्याही याचा फटका बसणार आहे. तन्वीचं अकाऊंट अचानक का बंद झालं, यामागचं कारण समोर आलं नाही. परंतु तन्वीच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. तन्वी कोलते गेल्या आठवड्यात प्रभू शेळकेच्या मदतीने 'बिग बॉस मराठी ६'च्या या घरात या आठवड्याची कॅप्टन झाली आहे. 'लक्ष्मी निवास' मालिकेतून तन्वी कोलतेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता तन्वी कोलतेचं इनस्टाग्राम अकाऊंट पुन्हा कधी चालू होणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.