"आमच्या आयुष्यात...", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 08:46 IST2026-01-24T08:44:00+5:302026-01-24T08:46:08+5:30
अंकिता वालावलकरच्या घरी आली नवीन सदस्य! नवऱ्यासह फोटो शेअर करत म्हणाली- "आमच्या आयुष्यात..."

"आमच्या आयुष्यात...", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव
Ankita Walawalkar Post: अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हे नाव प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन ही कोकणकन्या चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. अंकिता ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. दरम्यान, अंकिता सोशल मीडियाव देखील कमालीची सक्रिय असते. यामाध्यामातून ती आपल्या चाहत्यांना तिच्या दैनंदिन आयुष्याविषयी अपडेट्स देत असते. नुकतीच अंकिताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
नुकतंच अंकिता आणि कुणालच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं. या जोडप्याने नवी गाडी खरेदी करत चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे. सोशल मीडियावर नवीन गाडीची झलक दाखवत अंकिताने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलंय, आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं.दुसरी कार घेतली. या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत.माझ्या आणि कुणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील.कृतज्ञता, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे. अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
दरम्यान, अंकिता-कुणालने मारुती सुझुकीची स्विफ्ट कार खरेदी केली आहे.सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत ५.७९ लाख इतकी आहे. आधी ऑडी कार आणि आता स्विप्ट घेत या जोडप्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. अंकिता आणि कुणालने सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अंकिता आणि कुणालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्री तितीक्षा तावडे म्हणते, "अभिनंदन..." तर लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने सुद्धा दोघांनाही शुभेच्छा देत या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.