Bigg Boss Marathi 4 : ए बाबा, तू ये ना! मुलाची हाक ऐकून आरोह वेलणकरला अश्रू अनावर; बाबांना भेटून मारली घट्ट मिठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:20 IST2022-12-22T13:19:47+5:302022-12-22T13:20:49+5:30
फॅमिली वीकमध्ये आरोह वेलणकरचे कुटुंबीय आले आहेत. आई आणि आज्जी सोबत आलेल्या या छोट्या मुलाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

Bigg Boss Marathi 4 : ए बाबा, तू ये ना! मुलाची हाक ऐकून आरोह वेलणकरला अश्रू अनावर; बाबांना भेटून मारली घट्ट मिठी
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता टॉप ५ स्पर्धकांसाठी ३ आठवडे शिल्लक आहेत. जसेजसे पर्व शेवटाकडे जात आहे स्पर्धक भावूक झाले आहेत. सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत.
कलर्स मराठीने नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फॅमिली वीकमध्ये आरोह वेलणकरचे (Aroha Velankar) कुटुंबीय आले आहेत. आई आणि आज्जी सोबत आलेल्या या छोट्या मुलाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. ' बाबा, तू ये ना'अशी हाक तो आरोहला मारतो तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते. वडिलांना पाहिल्यानंतर आरोहचा मुलगा त्याला मिठी मारतो. याक्षणी आरोहच्या अश्रूंचा बांध फुटतो. ॉ
कोण होणार विजेता?
‘बिग बॉस मराठी ४' ता कोण होणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. घरातील ७७ दिवस पार पडले आहेत त्यामुळे आता विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे हे ‘बिग बॉस मराठी 4’च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र मायबाप प्रेक्षक कोणाला आपला कौल देतात, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.