Bigg Boss Marathi 2 Grand Finale Live Updates:महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांचे असे केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:59 IST2019-09-01T20:16:23+5:302019-09-01T20:59:04+5:30
बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाच्या फिनालेच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी सगळ्या स्पर्धकांचे कौतुक केले.

Bigg Boss Marathi 2 Grand Finale Live Updates:महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांचे असे केले कौतुक
बिग बॉस मराठीचा कोणीही विजेता ठरला तरी माझ्यासाठी अंतिम सहा स्पर्धक विजेते असल्याचे महेश मांजरेकर यांनी कबूल केले. त्यांनी आपल्या खास शैलीत या सहा स्पर्धकांचे विश्लेषण केले.
शिव ठाकरेने त्याच्या वावराने प्रेक्षकांची मने जिंकली असे महेश यांनी म्हटले... शिव याचे हे महेश यांनी केलेले हे कौतुक ऐकून तो प्रचंड खूश झाली तर शिवानीचा कमबॅक झाल्यानंतर अरे बापरे अशी माझी पहिली प्रतिक्रिया असल्याचे महेश यांनी सांगितले तर या कार्यक्रमासाठी ती खऱ्या अर्थाने तडका होती असे देखील त्यांनी म्हटले.
नेहा शितोळे ही मुलांच्या इतकीच सगळेच चांगली टास्क खेळली. या टास्कमध्ये मेघा धाडेची झलक पाहायला मिळाली असे त्यांनी कबूल केले. आरोह वेलणकरने वाईल्ड कार्ड एंट्री द्वारे या कार्यक्रमात एंट्री घेतली होती. तो या कार्यक्रमात सुरुवातीपासून असायला हवा होता. त्याने सत्याच्या बाजूने नेहमीच आपली बाजू मांडली हे त्यांना आवडल्याचे त्यांनी सांगितले. किशोरी शहाणे यांचा प्रवास अतिशय वळणावळणाचा असल्याचे त्यांनी सांगितले तर वीणा या कार्यक्रमाची स्पर्धक असणार याची खात्री असल्याचे त्यांनी कबूल केले.