कधी सुरु होणार 'बिग बॉस १९'? तारीख आणि वेळ नोंद करुन ठेवा, सलमानने केलं खास आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:26 IST2025-08-21T17:23:44+5:302025-08-21T17:26:42+5:30
'बिग बॉस १९' चा ग्रँड प्रीमिअर किती वाजता आहे आणि शो कुठे बघायला मिळणार, जाणून घ्या

कधी सुरु होणार 'बिग बॉस १९'? तारीख आणि वेळ नोंद करुन ठेवा, सलमानने केलं खास आवाहन
ज्याची सर्वांना उत्सुकता आहे असा शो म्हणजे 'बिग बॉस १९'. हा शो पाहण्यासाठी फक्त भारतातील नव्हे तर भारताबाहेरील अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बिग बॉस १९' जेव्हा सुरु होतं तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी पर्वणी मिळते. यंदाचा 'बिग बॉस १९' सुद्धा धमाकेदार असेल यात शंका नाही. सलमान खानच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. कधी सुरु होणार 'बिग बॉस १९', याशिवाय सलमानने प्रेक्षकांना काय आवाहन केलंय, जाणून घ्या.
सलमानचं 'बिग बॉस १९' पाहण्यासाठी केलं खास आवाहन
मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शोच्या एका नवीन प्रोमोमध्ये सलमान खानने प्रेक्षकांना एक खास आवाहन केलं आहे. 'बिग बॉस' हा शो कुटुंबासोबत पाहण्याची विनंती सलमानने केली आहे. तो प्रोमोमध्ये म्हणतो, "जेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हा अधिक मजा येते. त्यामुळे, 'बिग बॉस' कुटुंबासोबत पाहा." हे विधान 'बिग बॉस'च्या आतापर्यंतच्या सीझनला छेद देणारे आहे. कारण हा शो अनेकदा वादविवाद आणि भांडणांमुळे चर्चेत राहिला आहे, ज्यामुळे हा शो कुटुंबासोबत पाहण्यासारखा नसतो. त्यामुळे, यंदाच्या पर्वात काहीतरी वेगळे आणि कुटुंबासाठी मनोरंजक असे पाहायला मिळेल, अशी आशा सर्वांना आहे.
नवीन पर्व, नवीन नियम
'बिग बॉस'चे निर्माते दरवर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतात. बिग बॉसच्या यंदाच्या १९व्या पर्वात टीव्ही आणि ओटीटी दोन्हीवर हा शो एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्या सोयीनुसार शो पाहता येईल. या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत, पण दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोरंजन, वादविवाद आणि रोमांचक टास्कचा पाहायला मिळतील. याशिवाय 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी जिओहॉटस्टारवर ९ वाजता तर कलर्स टीव्हीवर १०.३० वाजता पाहता येणार आहे.