'बिग बॉस 18' फेम रजत दलाल अडकला लग्नबेडीत, कोणासोबत बांधली लग्नगाठ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 18:17 IST2026-03-29T18:11:50+5:302026-03-29T18:17:05+5:30
'बिग बॉस 18' फेम रजत दलाल अडकला लग्नबंधनात! निसर्गाच्या सानिध्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

'बिग बॉस 18' फेम रजत दलाल अडकला लग्नबेडीत, कोणासोबत बांधली लग्नगाठ?
Rajat Dalal Wedding: गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातील बरेच कलाकार, सेलिब्रिटीलग्नबंधनात अडकले. आपल्या जोडीदारासोबत साताजन्माची गाठ बांधून अनेकांनी नव्या प्रवासाला सुरुवात केली. या यादीमध्ये आता आणखी एका सेलिब्रिटीचं नाव सामील झालं आहे. बिग बॉस १८' आणि 'द ५०' चा स्पर्धक रजत दलालने नुकतंच लग्न केलं आहे. रजतने स्वतः सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या कलाविश्वातील सेलिब्रिटी तसेच चाहते मंडळींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा केलाय.
'बिग बॉस १८' आणि 'द ५०' या शोमुळे रजत दलाल चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. नुकताच तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबेडीत अडकला आहे. अलिकडेच 'द ५०' या शोमध्ये रजतने लवकरच लग्न करण्याचे संकेत दिले होते. अशातच रजतने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली आहे.उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गंगा नदीच्या काठावर त्यांचा विवाह संपन्न झाला. या लग्नाला त्याचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि इतर उपस्थित होते."जीवन के एक नए पहलू की शुरुवात...", असं सुंदर कॅप्शन देत त्याने आपल्या शाही लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या रजतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये रजत आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. काही फोटोंमध्ये त्यानं पत्नीचा हात धरलेला दिसत आहे.
लग्नासाठी रजत आणि त्याच्या पत्नीने खास लूक केला आहे. रजत दलालने लग्नात ऑफ-व्हाइट शेरवानी परिधान केली होती, तर त्याच्या पत्नीनं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. दरम्यान, रजत दलालने अद्याप आपल्या पत्नीची ओळख उघड केलेली नाही.