Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, घरात नवा सदस्य म्हणून कुणी व्यक्ती नव्हे तर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:55 PM2022-12-26T15:55:57+5:302022-12-26T15:57:03+5:30

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’चा हा नवा प्रोमो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल...

bigg boss 16 new wild card entry housemates welcomes dog maheen | Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, घरात नवा सदस्य म्हणून कुणी व्यक्ती नव्हे तर...!

Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, घरात नवा सदस्य म्हणून कुणी व्यक्ती नव्हे तर...!

googlenewsNext

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील सर्वात गोड सदस्य अब्दु शोमध्ये परतला आहे आणि आता बिग बॉसच्या इतिहासात कधीही घडलं नाही, असं काही घडणार आहे. होय, ‘बिग बॉस 16’चा नवा प्रोमो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यंदाच्या सीझनमध्ये प्रथमच वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून एक डॉगी बिग बॉसच्या घरात येणार आहे. कदाचित तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आता ही नवी काय भानगड आहे ते आम्ही सांगणार आहोत...

प्रोमोत एक डॉगी घरात एन्ट्री करताना दिसतोय. त्याचं नाव माहिम आहे. डॉगीची एन्ट्री होताच बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य आनंदाने उड्या मारायला लागतात. सगळे माहिमसोबत खेळायला लागतात आणि क्षणात घरातील वातावरण बदलून जातं.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर बिग बॉस प्रत्येक सदस्याला त्यांची विश विचारतात. यानंतर सर्व सदस्य कुटुंबीयांना मिस करत आहेत, असं बिग बॉसच्या लक्षात येतं. पण हा फॅमिली वीक नाही, असं म्हणून बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आप्तांची भेट घालून देण्यास नकार देतात. यानंतर काय तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना मिस करत आहात? असं बिग बॉस विचारतात. यावर सगळे सदस्य होकारार्थी उत्तर देतात आणि यानंतर माहिमची एन्ट्री होते.

आता माहिमच्या एन्ट्रीमागे बिग बॉसचा आणखी काय गेम प्लान आहे का? तो किती दिवस घरात राहणार? हे तर आम्हाला ठाऊक नाही. आगामी एपिसोडमध्ये ते कळेलच.

Web Title: bigg boss 16 new wild card entry housemates welcomes dog maheen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.