भारती सिंहचं युट्यूब चॅनल हॅक, हॅकरने नावातही केला बदल; 'लाफ्टर क्वीन' ने मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:21 IST2024-07-18T13:20:02+5:302024-07-18T13:21:06+5:30

इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने आणि पती हर्षने मदत मागितली आहे.

Bharti Singh s YouTube channel hacked hacker also changed name bharti asks for help | भारती सिंहचं युट्यूब चॅनल हॅक, हॅकरने नावातही केला बदल; 'लाफ्टर क्वीन' ने मागितली मदत

भारती सिंहचं युट्यूब चॅनल हॅक, हॅकरने नावातही केला बदल; 'लाफ्टर क्वीन' ने मागितली मदत

कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.  तिचा हजरजबाबीपणा, कॉमेडीला तोड नाही. भारतीचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे ज्यावर ती पॉडकास्ट करते. तसंच रोज व्लॉग अपलोड करत असते. तिच्या शूटबद्दल असो किंवा तिचा क्युट मुलगा गोलाच्या गंमतीजमती असो ती चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र भारती आता अडचणीत सापडली आहे कारण तिचं युट्यूब चॅनल हॅक झालं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने आणि पती हर्षने मदत मागितली आहे.

भारती सिंह आणि पती हर्ष इन्स्टाग्राम स्टोरी शेअर म्हणाले, 'आमचं चॅनल हॅक झालं आहे. चॅनलच्या नावातही बदल करण्यात आला आहे. उद्या पॉडकास्ट आहे सगळं तयार आहे आणि आज चॅनल हॅक झालं. असं कसं हॅक केलं भाई?  ज्याला यामधलं कळत असेल त्यांनी आमची कृपया मदत करा." 

भारती आणि हर्षने 'युट्यूब इंडिया'ची मदत मागितली आहे. उद्याच्या पॉडकास्टआधी त्यांचं चॅनल हॅक झाल्याने दोघंही चिंतेत आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जितेंद्र कुमार, अवनीत कौर, अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी, एल्विश यादवसह बऱ्याच जणांनी भारतीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे.

Web Title: Bharti Singh s YouTube channel hacked hacker also changed name bharti asks for help