'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 05:11 PM2022-08-19T17:11:17+5:302022-08-19T17:12:05+5:30

Bus bai bus: तब्बल १६ वर्षांनंतर कोंबडी पळाली या गाण्यावर भरत जाधव-क्रांती रेडकर ही जोडी थिरकल्याचं पाहायला मिळालं.

bharat jadhav and kranti redkar will dance on kombadi palali song in bus bai bus show | 'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल

'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल

googlenewsNext

छोट्या पडद्यावर अलिकडेच 'बस बाई बस' (bus bai bus) हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील काही रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. यात लवकरच या कार्यक्रमात अभिनेता भरत जाधव (bharat jadhav) आणि क्रांती रेडकर (kranti redkar) हजेरी लावणार असून तब्बल १६ वर्षांनी त्यांनी 'जत्रा' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये 'बस बाई बस'च्या मंचावर भरत जाधव आणि क्रांती रेडकर उपस्थित असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या दोघांनी जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यावर एकत्र ताल धरला. तब्बल १६ वर्षांनंतर या गाण्यावर पुन्हा एकदा ही जोडी थिरकल्याचं पाहायला मिळालं.

भरत  जाधव आणि क्रांती रेडकरच्या जोडीने 'जत्रा' चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर त्यांनी एकत्र पाहिल्यावर चाहते आनंदले होते. त्यातच या दोघांनी त्याच उत्साहात पुन्हा एकदा कोंबडी पळाली गाण्यावर डान्स केल्यामुळे हा प्रोमो चांगलाच चर्चिला जात आहे.
 

Web Title: bharat jadhav and kranti redkar will dance on kombadi palali song in bus bai bus show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.