बहिणीच्या लग्नाचा विचार आला की रडतो 'हा' अभिनेता, तिच्यासाठी अभिनयही सोडणार होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:12 IST2025-06-13T10:11:38+5:302025-06-13T10:12:35+5:30

टीव्ही विश्वात भावा बहिणीची जोडी प्रसिद्ध आहे.

ayaan zubair loves his sister jannat thought of leaving acting for her to spend time with her | बहिणीच्या लग्नाचा विचार आला की रडतो 'हा' अभिनेता, तिच्यासाठी अभिनयही सोडणार होता

बहिणीच्या लग्नाचा विचार आला की रडतो 'हा' अभिनेता, तिच्यासाठी अभिनयही सोडणार होता

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री जन्नत जुबैरने (Jannat Zubair) खूप कमी वयात यश मिळवलं. तसंच तिचा भाऊ अयान जुबैरही (Ayaan Zubair) लोकप्रिय आहे. भावाबहिणीची जोडी सोशल मीडियावर कायमच लक्ष वेधून घेते. त्यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीत जन्नत जुबैर बॉलिवूड अभिनेत्रींच्याही पुढे आहे. जन्नत आणि अयान यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र एक अशी वेळ आली जेव्हा अयानने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. याचं कारण त्याची बहीणच आहे असं तो म्हणाला.

नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत अयान जुबैर म्हणाला, "जन्नतचं 'तू आशिकी'चं शूट सुरु होतं आणि मी 'चंद्रशेखर आझाद'चं शूट करत होतो. आम्ही दोघंही कामात व्यग्र होतो. एका पॉइंटला मला वाटलं की मी अजून काम करु शकत नाही. माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. मी तिच्यापासून अजिबातच दूर राहू शकत नाही. दिवसातून एक वेळ तरी मला तिच्यासोबत वेळ घालवायचा असतो. त्यावेळेला आम्ही दोघंही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत होतो. त्यामुळे आम्हाला भेटताच यायचं नाही. हे एका आठवडा चाललं."


तो पुढे म्हणाला, "तेव्हा मला वाटलं की आता मी आणखी काम करु शकत नाही. आम्ही एकाच घरात राहूनही भेटू शकत नाहीए. मी तर जन्नतच्या लग्नाचीही कल्पना करु शकत नाही. तिच्या लग्नाचा विचार आला की मला रडूच येतं. मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही."

जन्नत जुबैर सध्या 'द ट्रेटर्स' मध्ये दिसत आहे. 'फुलवा', 'काशी' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत ज्यात ती बालकलाकार म्हणून मुख्य भूमिकेत होती. यानंतर 'तू आशिकी','भारता का वीर पुत्र महाराणा प्रताप' या मालिकांमध्येही ती दिसली. तर तिचा भाऊ अयान जुबैर 'अशो सम्राट','ये तेरी गलियां','जी करदा','चंद्रशेखर' या मालिकांमध्ये दिसला.

Web Title: ayaan zubair loves his sister jannat thought of leaving acting for her to spend time with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.