"'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.." वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:37 IST2025-09-11T13:37:35+5:302025-09-11T13:37:58+5:30

अश्विनीनं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

Ashwini Mahangade Shared Emotional Post Talks About Her Late Father And Home | "'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.." वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…

"'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.." वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साधेपणामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. या कलाकारांचा साधेपणा हा नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असतो. अशीच आपल्या साधेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे.  सोशल मीडियावर अश्विनी ही कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. त्याचबरोबर काही सामाजिक आणि राजकीय विषयांवरही ती तिची मतं व्यक्त करत असते. आता अश्विनीनं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अश्विनीनं इन्स्टाग्रामवर गावच्या घरातील फोटो शेअर केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "चूल... नानांनी खूप प्रेमाने बंगला बांधला आणि सगळ्यात मागे ऐक खोली काढली ती चुलीसाठी. बऱ्याचदा आम्ही जेवायला इथेच बसतो. पण, मला वाटते आमच्या यात्रेला या खोलीचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. हा फोटो मला फार आवडला. कारण, घरात मी मोठी असल्या कारणाने मी भाकरी करते आहे आणि माझी दोन्हीही लहान भावंडं म्हणजे जिजा आमच्या वकिलीनबाई व बद्रीशेट जेवणाचा आनंद घेत आहेत. सोबत आमचा राया". 

पुढे तिनं लिहलं, "'स्वराज्य' आमच्या घरचे नाव देताना नानांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि ते स्वराज्य वाढवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतोय". अश्विनी ही 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'अस्मिता' व 'आई कुठे काय करते' अशा काही लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचली. सध्या ती स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसतेय. अश्विनी या मालिकेत 'माया' ही भूमिका साकारतेय.


Web Title: Ashwini Mahangade Shared Emotional Post Talks About Her Late Father And Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.