Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:48 IST2022-07-26T14:43:33+5:302022-07-26T14:48:24+5:30
Hardeek joshi: अक्षया, हार्दिक, नितीश आणि दिप्ती देवी लंडन दौऱ्यावर असून हा व्हिडीओ तिथलाच आहे.

Video: पाठकबाईवरुन राणादा अन् आज्यामध्ये वाद; पाहा अभिनेत्रीने कोणाला दिलं झुकतं माप
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar). पाठकबाई ही साध्या शिक्षिकेची भूमिका साकारुन अक्षयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे याच पाठकबाईंमुळे चक्क राणादा (hardeek joshi) आणि आज्यामध्ये (nitish chavan) भांडण झालं आहे. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लागीरं झालं जी' या मालिकेत आज्या ही भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याने राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीसोबतच्या भांडणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे भांडण अंजलीमुळे म्हणजे अक्षयामुळे झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे भांडण खरंखुरं नसून केवळ मजेचा भाग असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या अक्षया, हार्दिक, नितीश आणि दिप्ती देवी लंडन दौऱ्यावर असून हा व्हिडीओ तिथलाच आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक आणि नितीश 'मैं खिलाडी तू अनारी' या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात मध्येच अक्षया येते आणि तिच्यावरुन हे दोघं मज्जेमध्ये एकमेकांशी भांडण करतात. सध्या सोशल मीडियावर या तिघांचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. सध्या ही कलाकार मंडळी लंडन दौऱ्यावर असून लवकरच ते एका चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जातं.