भांडी घासण्याचा trauma असणाऱ्या अंकिताला फोटो काढायलाही आवडायचं नाही, म्हणाली- "१२वी पर्यंत मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:01 IST2024-08-28T13:58:57+5:302024-08-28T14:01:14+5:30
कोकण हार्टेड गर्ल फेम अंकिता वालावलकरला फोटो काढायला आवडत नाही. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं (ankita walawalkar, bigg boss marathi 5)

भांडी घासण्याचा trauma असणाऱ्या अंकिताला फोटो काढायलाही आवडायचं नाही, म्हणाली- "१२वी पर्यंत मी..."
कोकण हार्टेड गर्ल फेम अंकिता प्रभू वालावलकर ही सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चांगलीच चर्चेत आहे. कधी मिश्किल स्वभाव, कधी कोपरखळ्या, टास्कमध्ये पूर्ण सहभाग अशा विविध गोष्टींमुळे अंकिताची सध्या चांगलीच चर्चा आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वी तिला भांडी घासण्याचा trauma असल्याचं सांगितलं होतं. आता अंकिताची एक मुलाखत चांगलीच व्हायरल झालीय. या मुलाखतीत तिला फोटो काढायला का आवडायचं नाही याचाही खुलासा तिने केलाय.
अंकिताला फोटो काढायला का आवडायचं नाही?
अंकिताने that odd engineer च्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिला फोटो काढायला का आवडायचं नाही हे सांगितलं. अंकिता म्हणाली, "मला फोटो काढायला आवडायचं नाही. म्हणजे अगदी १२ वीपर्यंत मी एकही फोटो काढला नसेल. कारण असं होतं की माझं नाक मोठं आहे. त्यामुळे फोटो काढायला तितकं आवडायचं नाही. त्यामुळे फोटो घाण येतात, असं मला वाटायचं. नंतर मग मी मुद्दाम फोटो काढायला लागली. येतात ना घाण तर काढूनच बघायचं. ज्या ठिकाणी वाटेल की, हे नाही केलं पाहिजे त्या गोष्टी करुन बघायच्या. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी करायच्या. मग आपण openup होत जातो."
अंकिता या मुलाखतीत पुढे म्हणाली, "मला पाण्याची भीती वाटते. पण २०२४ ची सुरुवात मी स्कूबा डायव्हिंगने केली होती. मला वाटणारी पाण्याची भीती मला काढायची होती. आता मला बंजी जंपिंग वगैरे सर्व करायचंय. मला सगळ्याची भीती वाटते पण मी ते करणार." अशाप्रकारे अंकिताने खुलासा केला. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अंकिता पहिली कॅप्टन झाली होती. अंकिता घरात तिच्या बोलण्याने आणि खेळण्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप पाडतेय.